मुंबईतील छठपूजेच्या उत्सवाला आता ग्लॅमरची जोड मिळणार आहे. शिवसेना नेते संजय निरुपम यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत उद्या अभिनेत्री तमन्ना भाटिया जूहू चौपाटीवर येणार असल्याची माहिती दिली आहे. छठ व्रतीची भूमिका साकारल्याबद्दल तमन्नाचा सन्मान करण्यात येणार असल्याचे निरुपम यांनी म्हटले आहे. तसेच अभिनेता सोनू सूदही छठपूजा कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे छठपूजेच्या निमित्ताने राजकीय वातावरण अधिकच रंगण्याची शक्यता आहे.मुंबईतील जुहू चौपाटीवर उद्या छठ पूजेचा भव्य सोहळा पार पडणार आहे. जुहू चौपाटी येथून आढावा घेतला आहे NDTV मराठीची प्रतिनिधी पद्मेश पवार यांनी