तुडुंब भरलेल्या लोकलमधून महिला खाली पडली, Diva-Mumbra दरम्यानच्या वळणावरील घटना

मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतील गर्दीचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे.दिवा ते मुंब्रा दरम्यान एका महिलेचा लोकलमधून पडून अपघात झाला.सकाळी ७.५६ ची डोंबिवली लोकल प्रवाशांनी तुडुंब भरलेली होती. गर्दीमुळे महिलेचा तोल गेला. सिग्नलवर गाडी उभी असताना महिला खाली पडल्याची माहिती मिळाली आहे.या घटनेत महिला किरकोळ जखमी झाली.सेंट्रल रेल्वे मार्गावर अशा घटना वारंवार घडत असल्याचा आरोप प्रवासी संघटनांनी केला आहे.प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी आता पुन्हा जोर धरू लागली आहे.

संबंधित व्हिडीओ