Hingoli तील Maratha- Kunbi प्रमाणपत्रासाठी विशेष शिबीर, शिबीराबाबत Ashima Mittal काय म्हणाल्या?

हिंगोली जिल्ह्यात मराठा कुणबी कुणबी मराठा प्रमाणपत्रासाठी विशेष शिबीर आयोजित करण्यात आली आहेत.. जिल्ह्यातील 40 महसूल मंडळामध्ये हे शिबीर आयोजित करण्यात आलेली आहे.. हिंगोली जिल्ह्यात मराठा कुणबी, कुणबी मराठा अशा 4 हजार 599 नोंदी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.. मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्रासाठी अडचणी येऊ नये यासाठी शासनाकडून विशेष शिबिर आयोजित करण्यात आली आहेत, मात्र पहिल्याच दिवशी या विशेष शिबिराला शासनाने दिलेल्या आदेशाला अधिकाऱ्यांनी खो दिल्याचे पाहायला मिळत आहे.. विशेष शिबिराच्या पहिल्या दिवशी मंडळ कार्यालय बंद असल्याने मराठा समाज बांधवांची मोठी निराशा झाल्याचे पाहायला मिळत आहे.. मंडळ कार्यालय बंद असल्याने मराठा समाज बांधवांनी या कार्यालयासमोर घोषणाबाजी देखील केली आहे. शिबीरांबाबत जालना जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी काय प्रतिक्रिया दिलीय पाहूया..

संबंधित व्हिडीओ