
सोशल मीडियावर हत्तींचे कित्येक अतिशय गंमतीशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात, हे व्हिडीओ पाहून चेहऱ्यावर हसू नक्की येते. हत्तीच्या कळपाचा असाच एक गंमतीशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हत्तींचा कळप तलवामध्ये सावधगिरी बाळगून उभे आहेत आणि त्यांच्या सुरक्षेत त्यांची पिल्लं पाण्यात मस्ती करत आहेत. आयएएस अधिकारी संजय कुमार यांनी शेअर केलेला व्हिडीओ आयएफएस अधिकारी रमेश पांडे यांनी रीपोस्ट केलाय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील अमनगड टायगर रीझर्व्ह येथे हा व्हिडीओ शूट करण्यात आलाय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
IFS अधिकारी रमेश पांडे व्हिडीओ शेअर करत कॅप्शन दिलंय की, "या हत्तींकडून त्यांच्या पिल्लांना एकप्रकारे झेड प्लस सुरक्षा दिली जातेय. पाण्यात मस्ती करणाऱ्या पिल्लांना त्यांची आजी, आई आणि मावशी घेरुन त्यांची काळजी घेत आहेत".
(नक्की वाचा: एण्ट्रीवर डीजवाल्याने चुकीचे गाणं लावल्याने नववधू भडकली, VIRAL VIDEO पाहून लोक म्हणाले- बरं झालं!)
पाहा Video:
It's another kind of Z plus security provided by the elephants to their young ones. The water frolicking calf is encircled and being taken care of by the Grandma, mother and aunts. #MothersDay pic.twitter.com/splHpp0hMC
— Ramesh Pandey (@rameshpandeyifs) May 11, 2025
व्हिडीओमध्ये सहा मोठे हत्ती आरामात पाण्यामध्ये स्वतःची तहान भागवताना आणि शरीराला थंडावा देताना दिसत आहेत. दुसरीकडे दोन पिल्लं मोठ्या हत्तींच्या सुरक्षेत पाण्यात खेळताना दिसत आहेत. ही संरक्षणात्मक रचना हत्तींच्या कुटुंबांतील जन्मजात संरक्षण प्रणाली दर्शवते. जेथे कळपातील सर्वात छोट्या पिल्लूची सुरक्षा करणे ही मोठ्या हत्तींची जबाबदारी असते.
(नक्की वाचा: माधुरी दीक्षितच्या गाण्यावर तरुणींनी धबधब्याखाली केला डान्स, VIDEO पाहून विसराल अभिनेत्रीचा डान्स)
That kiddo learning from mother the right way to eat grass. Not even small dirt should go in stomach. See. pic.twitter.com/0UIO3l2Ro3
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) April 15, 2025
आणखी एक हृदस्पर्शी व्हिडीओ IFS अधिकारी परवीन कासवान यांनी शेअर केलाय, ज्यामध्ये हत्तीचे पिल्लू त्याच्या आईच्या मार्गदर्शनानुसार काळजीपूर्वक गवत खायला शिकतंय. कासवान यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "हे पिल्लू आपल्या आईकडून गवत खाण्याची योग्य पद्धत जाणून घेत आहे. पोटामध्ये थोडीशीही घाण जाता कामा नये". हत्तींचा हा व्हिडीओ देखील नेटकऱ्यांना प्रचंड आवडतोय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world