
Wedding Card Viral: सोशल मीडियावर बहुतांश वेळेस चित्रविचित्र गोष्टी व्हायरल होत असतात. यामध्ये विचित्र लग्नपत्रिकांचाही समावेश असतो. कधी कधी पत्रिकेवर वधू-वराच्या नोकरीची माहिती छापलेली असते. एका लग्नपत्रिकेमध्ये चक्क मृत नातेवाईकांचे नावंही 'दर्शनाभिलाषी' म्हणून नमूद करण्यात आली होती आणि ही चित्रविचित्र पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दर्शनाभिलाषीमध्ये मृतांची नावे वाचून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
व्हायरल झालेल्या या लग्नपत्रिकेमध्ये नवऱ्याचे नाव लोटा नाथ तर नवरीचे नाव लोटकी देवी असे होते. याहून त्यांच्या आईवडिलांचे नाव गंमतीशीर होते. पत्रिकेवर लग्नाच्या ठिकाणाबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याने हे कार्ड केवळ मनोरंजनासाठी तयार करण्यात आले होते, हे स्पष्ट आहे.
(नक्की वाचा: एण्ट्रीवर डीजवाल्याने चुकीचे गाणं लावल्याने नववधू भडकली, VIRAL VIDEO पाहून लोक म्हणाले- बरं झालं!)
इन्स्टाग्राम अकाउंट @amritayd383 वर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये ही चित्रविचित्र लग्नपत्रिका पाहायला मिळाली. या लग्नपत्रिकेमध्ये काही गंमतीशीर नावांचा समावेश होता. हे कार्ड नवी दिल्लीतील गोविंदपूर मेट्रो स्टेशनजवळ राहणाऱ्या संतोष जी महाराज यांनी छापलेले दिसते, दरम्यान त्यांचाही अचूक पत्ता नमूद करण्यात आलेला नाही.
पाहा व्हिडीओ
व्हिडीओमध्ये महिला लग्नपत्रिका पाहू लागते तेव्हा अधिक गंमतीशीर मजकूर उघडकीस आला. लोटकी देवीच्या आईवडिलांचे नाव मग देवी आणि बाल्टी नाथ असे होते. लग्नाची तारीख 25 एप्रिल 2025 नमूद करण्यात आलीय पण लग्न कुठे होणार आहे, याचा पत्ताच नव्हता.
(नक्की वाचा: माधुरी दीक्षितच्या गाण्यावर तरुणींनी धबधब्याखाली केला डान्स, VIDEO पाहून विसराल अभिनेत्रीचा डान्स)
हा व्हिडीओ तीन लाखांहून अधिक वेळा पाहिला गेलाय आणि कित्येक युजर्संकडून कमेंट बॉक्समध्ये गंमतीशीर प्रतिक्रियाही व्यक्त करण्यात आल्या आहेत. एका युजरने लिहिलंय की,"असे जोडपे खरंच आहे का?" दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ही आतापर्यंतची सर्वात गंमतीशीर लग्नपत्रिका आहे. तिसऱ्या व्यक्तीने लिहिलंय की, "वाह, काय जोडी आहे!"
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world