जाहिरात

Viral Video: एकाने पाय ठेवले, दुसरा थुंकला... परदेशी व्लॉगरचा भारतीय रेल्वेमधील भयानक अनुभव, ऐकून राग येईल

Viral Video: भारतात रेल्वे प्रवासादरम्यान आलेला धक्कादायक अनुभव परदेशी व्लॉगरने शेअर केलाय.

Viral Video: एकाने पाय ठेवले, दुसरा थुंकला... परदेशी व्लॉगरचा भारतीय रेल्वेमधील भयानक अनुभव, ऐकून राग येईल
"Viral Video: परदेशी व्लॉगरला भारतात ट्रेन प्रवासादरम्यान आलेला धक्कादायक अनुभव"
Backpacker Ben Insta

Viral Video: बॅकपॅकर बेन नावाच्या परदेशी व्लॉगर भारतामध्ये रेल्वेनं प्रवास करताना आलेला भयंकर अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय. संपूर्ण प्रवास त्याच्यासाठी किती अस्वस्थ करणारा ठरला, याची माहिती इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडीओद्वारे दिलीय. बेननं सांगितलं की, "समोर बसलेला एक प्रवासी स्वतःचे पाय वारंवार त्याच्या आसनावर ठेवत होता. कित्येकदा हटकल्यानंतरही तो हसायचा आणि दोन मिनिटांनंतर पुन्हा तिच कृती करायचा. शांतपणे त्याला समजावल्यानंतरही प्रवाशाच्या वागणुकीमध्ये काहीही फरक पडला नाही". 

पाहा व्हिडीओ

"भारतामध्ये रेल्वे प्रवासाचा भयानक अनुभव" 

हे प्रकरण येथेच थांबले नाही. बेनने पुढे असं सांगितलं की, प्रवासादरम्यान आणखी एक प्रवासी त्याच्या हातावर थुंकला. तो व्यक्ती काहीतरी खात होता, मी बसलो होतो तेथून जात असताना त्याने पाहिलं आणि माझ्यावर हातावर थुंकला. या घटनेने बेनला अधिकच अस्वस्थ केले. "भारतामध्ये रेल्वे प्रवासाचा भयानक अनुभव" असे कॅप्शन त्याने शेअर केलेल्या व्हिडीओ दिलंय.

Cockroach Coffee Trending Video: मेलेली झुरळं,किड्यांचा भुसा...या स्पेशल कॉफीची चर्चा, किंमत ऐकून बसेल 440 व्होल्टचा झटका

(नक्की वाचा: Cockroach Coffee Trending Video: मेलेली झुरळं,किड्यांचा भुसा...या स्पेशल कॉफीची चर्चा, किंमत ऐकून बसेल 440 व्होल्टचा झटका)

नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच भारतीय नेटकऱ्यांनी बेनवर देशाची प्रतिमा खराब करण्याचा आरोप केलाय. काहींनी म्हटलं की, जर बेनने दुसऱ्या किंवा पहिल्या श्रेणीने ट्रेनने प्रवास केला असता तर तो काही डॉलर्समध्ये अधिक आरामात प्रवास करू शकला असता. एका युजरने कमेंट केली की, मुद्दाम स्वस्त दराच्या तिकिटांच्या कोचमध्ये प्रवास करतात जेणेकरून त्यांना कंटेट मिळेल आणि नंतर तक्रार करता येईल.

Viral Video: वर्गात जो मूर्ख आहे, त्यानं उभं राहावं; शिक्षिकेच्या कृतीवर विद्यार्थ्यानं भरवर्गात असं काही केलं की...

(नक्की वाचा: Viral Video: वर्गात जो मूर्ख आहे, त्यानं उभं राहावं; शिक्षिकेच्या कृतीवर विद्यार्थ्यानं भरवर्गात असं काही केलं की...)

तर काही लोकांनी बेनची बाजू घेत म्हटलंय की समस्या समजून घेण्याऐवजी लोक क्रीएटरला दोष देत आहेत. एका युजरने म्हटलंय की, मलेशिया, सिंगापूर, व्हिएतनाम आणि जपान यासारख्या देशांमध्येही सर्वात स्वस्त ट्रेनमध्ये अशा गोष्टी घडत नाहीत. अनेक युजर्संनी हे वर्तन सामान्य म्हणून स्वीकारण्याच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com