जाहिरात
This Article is From Apr 14, 2024

गावात थंडीत नसतो सूर्यप्रकाश; गावकऱ्यांनी पृथ्वीवरच आणला सूर्य !

गावात थंडीत नसतो सूर्यप्रकाश; गावकऱ्यांनी पृथ्वीवरच आणला सूर्य !
गावात थंडीत नसतो सूर्यप्रकाश; गावकऱ्यांनी पृथ्वीवरच आणला सूर्य !
मुंबई:

सूर्याशिवाय मानवी जीवनाची कल्पनाच करता येत नाही. सूर्यकिरण मानवी जीवनासाठी खूप महत्त्वाची आहेत.  मुळात सूर्य नसता तर काहीच नसतं. पाण्याप्रमाणेच प्रकाश हेही मनुष्यासाठी जीवनावश्यक आहे. मानवी शरीर, निसर्ग, प्राणी, पक्षी या सर्वांनाच सूर्यप्रकाश महत्त्वाचा आहे. असं असलं तरीही पृथ्वीवरील काही ठिकाणे अशी आहेत की जिथे सूर्याचा प्रकाशच पोहोचत नाही. उत्तर इटलीतील विग्नेला गाव त्यापैकीच एक. या गावात हिवाळ्यात सूर्यप्रकाश नसतो. या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी गावकऱ्यांनी जबरदस्त जुगाड केला आहे. त्यांनी 'सूर्य पृथ्वीवरच उतरवला आहे. गावाने सूर्यप्रकाशासाठी स्वतःचा 'कृत्रिम सूर्य' बनवला आहे. 

हेही वाचा : जितेश शर्मा की सॅम करन, खरा उपकर्णधार कोण? सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये संभ्रम...

इटालियन-स्विस सीमेवर एका खोऱ्यात वसलेले 'विग्नेला' हे छोटेसे गाव एका वेगळ्याच समस्येला तोंड देत आहे. पर्वतांनी वेढलेले हे शहर दरवर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारी असे तीन महिने अंधारात बुडलेले असते. येथे खूप कमी लोकसंख्या आहे. शहराच्या एका बाजूला दरी आणि दुसऱ्या बाजूला पर्वत रांगा आहेत. थंडीच्या महिन्यात येथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही. 

हेही वाचा: मनोज जरांगेंकडून राजकीय पक्षांचं टेन्शन वाढवणारी घोषणा, आरक्षणाचा मुद्दा पुन्हा गाजणार

वाइस न्यूजनुसार, 1999 मध्ये विग्नेला येथील गियाकोमो बोन्झानी यांनी चर्चच्या भिंतीवर सनडायल बसवण्याचा प्रस्ताव मांडला होता, परंतु तत्कालीन महापौर फ्रँको मिडाली यांनी या प्रस्तावाला नकार दिला. सनडायलऐवजी, महापौरांनी गावात वर्षभर सूर्यप्रकाश मिळेल असे काहीतरी तयार करण्यास सांगितले.

लक्षावधीच्या खर्चिक प्रकल्पातून अवतरला कृत्रिम सूर्य!

सूर्यप्रकाशाचा मुकाबला करण्यासाठी गियाकोमो बोन्झानी आणि अभियंता जियानी फेरारी यांनी मिळून आठ मीटर रुंद आणि पाच मीटर लांबीचा एक मोठा आरसा तयार केला आहे. जो डोंगराच्या माथ्यावर ठेवण्यात आला आहे. ज्यातून सूर्यप्रकाश परावर्तित होऊन गावात पोहोचतो. गवात सुमार 200 लोकं राहतात. या कृत्रिम सूर्यापासून त्यांना सुमारे 6 तास प्रकाश मिळतो. ज्या विशाल काचेतून सूर्यप्रकाश गावात पोहोचतो, त्याचे वजन 1.1 टन आहे. हा आरसा संगणकाच्या मदतीने चालवला जातो. आरश्यामध्ये एक विशेष सॉफ्टवेअर प्रोग्राम स्थापित केला गेला आहे ज्यामुळे 95 टक्के सूर्यप्रकाश बदलतो. सॉफ्टवेअरमुळे, आरसा सूर्याच्या मार्गानुसार फिरतो. या प्रकल्पाच्या निर्मितीसाठी 1,00,000 युरो म्हणजेच 1 कोटी रुपये खर्च करण्यात आले. हा कृत्रिम प्रकाश नैसर्गिक सूर्यप्रकाशाइतका शक्तिशाली नाही, पण या प्रकाशामुळे लोक हिवाळ्यात घराबाहेर पडतात आणि एकमेकांना भेटतात.

माजी महापौर मिदाली यांनी 2008 मध्ये दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, 'प्रकल्पामागील कल्पना कोणत्याही वैज्ञानिक आधारावर आधारित नाही. हे मानवतावादी आधारावर केले जाते. या इटालियन शहरातील लोकांनी ज्या प्रकारे यश मिळवले, त्यामुळे जगातील इतर देशांनाही असे साहसी कार्य करण्यास प्रेरणा मिळाली आहे. 2013 मध्ये, दक्षिण-मध्य नॉर्वेमधील रजुकन या खोऱ्यात विग्नेलासारखा आरसा बसवण्यात आला होता.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com