जाहिरात
Story ProgressBack

जितेश शर्मा की सॅम करन, खरा उपकर्णधार कोण? सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये संभ्रम...

Read Time: 2 min
जितेश शर्मा की सॅम करन, खरा उपकर्णधार कोण? सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये संभ्रम...
जितेश शर्मा की सॅम करन, खरा उपकर्णधार कोण?
मुंबई:

आयपीएल 2024 च्या 27 व्या सामन्यात पंजाब किंग्जचा राजस्थान रॉयल्सने 3 विकेट्स राखून पराभव केला. पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्सला 148 धावांचं आव्हान दिलं होतं. विजयासाठी राजस्थान रॉयल्स चांगलीच धडपड करावी लागली. राजस्थान रॉयल्सला शेवटच्या बॉलमध्ये 10 धावांची गरज होती. त्यावेळी संघासाठी शिमरॉन हेटमायरने शेवटच्या 2 बॉलमध्ये 2 सिक्स मारत पंजाब किंग्जच्या हातातली मॅच हिसकावून घेतली. 

हेही वाचा : MI vs CSK मॅचचा बदलणार इतिहास! 17 वर्षांमध्ये पहिल्यांदाच दिसणार 'हे' चित्र

एकीकडे शेवटच्या षटकात राजस्थान रॉयल्सने मॅच जिंकत गुणतालिकेतील आपलं अव्वल स्थान आणखी भक्कम केलं आहे. मात्र सामन्याच्या सुरुवातीलाच असे काही घडले, ज्यामुळे चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. खरंतर शिखर धवन दुखापतीमुळे खेळत नव्हता. अशा स्थितीत पंजाब किंग्जकडून सॅम करन त्याच्या जागी टॉस करायला गेला. धवनच्या जागी करनला पाहून चाहते आश्चर्यचकित झाले.

हेही वाचा : टी-20 वर्ल्डकपआधी 'ही' गोष्ट कराच, CSK च्या कोचचा टीम इंडीयाला सल्ला

पंजाब किंग्सने जितेश शर्माला उपकर्णधारपदी अधिकृतपणे घोषित केले होते, पण टॉसच्या वेळी सॅम करनला पाहून चाहत्यांना धक्काच बसला. अशा परिस्थितीत धवनच्या अनुपस्थितीत जितेश शर्माने टॉस करायला जायला हवे होते. पण असे झाले नाही. यावर चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. 

हेही वाचा : धोनीला पाहण्यासाठी खरेदी केलं 64 हजार रुपयांचं तिकीट, मुलींची फी देखील भरली नाही

संघाचे प्रशिक्षक संजय बांगर यांनी घडलेल्या मुद्द्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. प्रशिक्षक संजय बांगर यांनी स्पष्टीकरण देत सांगितले की, जितेश पंजाबचा 'नियुक्त उपकर्णधार' नव्हता. कॅप्टनच्या फोटोशूटदरम्यान त्याची उपस्थिती फक्त सॅम करनच्या यूकेमधून उशिरा येण्यामुळे होती. जितेश नियुक्त केलेला उपकर्णधार नव्हता. तो स्पर्धेच्या सुरुवातीला कर्णधाराच्या सेमिनारला किंवा मीटिंगला उपस्थित राहिल्यामुळे हा प्रकार घडला असावा. गेल्या वर्षीही धवन खेळत नसताना संघाचे नेतृत्व सॅमने केले होते. सॅमला यूकेहून यायला उशीर झाला होता, त्यामुळेच आम्ही त्याला सीझनच्या सुरुवातीसाठी चेन्नईला पाठवू शकलो नाही. त्यामुळे जितेशला त्यावेळी पाठवण्यात आले. सॅम करन पंजाबसाठी आधीच उपकर्णधार म्हणून ठरला होता.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination