3 days ago

महाराष्ट्रातील नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. पाच डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता मुंबईतील आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील दिग्गज नेते, सेलिब्रेटी उपस्थित राहणार आहेत. शपथविधी सोहळ्याचा मुहूर्त ठरला असला तरी मुख्यमंत्री कोण होणार? याबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. भाजपकडून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा असून अखेरच्या क्षणी त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. 

Dec 01, 2024 21:11 (IST)

Live Update : मुंबई काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर

चांदिवली या विधानसभेतून मुंबई काँग्रेसचे प्रतिनिधी सूरज सिंग ठाकुर यांनी आरिफ नसीम खान यांच्या विरोधात काम केल्यामुळे त्यांना पक्षातून कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. या कारणे दाखवा नोटीसला सूरज सिंग ठाकूर यांनी सविस्तर पत्र लिहून उत्तर दिलं आहे

चांदिवली विधानसभेतील मी उमेदवारी मागितला होती त्याचा राग धरून आरिफ नसीम खान यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचून माझ्यावर खोटे आरोप लावले आहेत असा खुलासा केला आहे

त्याचासोबत लोकसभेच्या निवडणुकीत नसीम खान यांनी वर्षा गायकवाड यांना विरोध केला होता आणि त्यांच काम केल नव्हत आणि सातत्याने काँग्रेस कार्यकर्त्यांचे पाय खेचण्याच काम नसीम खान करत आहेत असा आरोप या पत्रातून सूरज सिंग ठाकूर यांनी केला आहे. 

Dec 01, 2024 19:59 (IST)

Live Update : चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत माध्यमांशी बोलणं टाळलं

महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आणि जनेतला धन्यवाद - चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत माध्यमांशी बोलणं टाळलं

मुख्यमंत्री कोण होणार यावर बावनकुळेचं मौन

प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा आटपून बावनकुळे भाजपच्या कार्यालयातून निघाले 

बैठकीत 5 डिसेंबरला शपथविधीच्या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवाहन

Dec 01, 2024 19:54 (IST)

Live Update : नवी मुंबईतील तुर्भे येथील एका घराला लागली आग

नवी मुंबईतील तुर्भे येथील एका घराला लागली आग

आग लागली तेव्हा घरामध्ये कोणीही नसल्यामुळे जीवितहानी टळली

अग्निशमन दलाच्या टीमला आगीवर नियंत्रण मिळवण्या यश

अद्याप आगीचे कारण अस्पष्ट

कोणत्याच प्रकारची जीवित हानी नाही

अग्निशामक दल व पोलीस घटनास्थळी दाखल

Dec 01, 2024 19:21 (IST)

Live Update : थोड्याच वेळात एकनाथ शिंदे टेंभी नाका येथे पोहोचतील

थोड्याच वेळात एकनाथ शिंदे टेंभी नाका येथे पोहोचतील

आनंद आश्रमात एकनाथ शिंदे यांच्याकडून काही पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन

Advertisement
Dec 01, 2024 18:24 (IST)

Live Update : ही राजकीय संस्कृती, अजित दादांच्या आमदाराकडून ठाकरेंच्या नेत्याची भेट घेत शुभेच्छा!

चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार शेखर निकम यांनी निवडून आल्यानंतर आज शिवसेना उबाठाचे नेते व  गुहागर विधानसभा मतदारसंघांचे आमदार भास्कर जाधव यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील निवासस्थानी निकम यांनी ही भेट घेतली. यावेळी भास्कर जाधव यांनीही शेखर निकम यांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि भास्कर जाधव यांचे चिरंजीव विक्रांत जाधव, सुवर्णाताई जाधव, शेखर निकम यांचे चिरंजीव अनिरुद्ध निकम आदी उपस्थित होते.

Dec 01, 2024 17:50 (IST)

Live Update : Live Update : जितेंद्र आव्हाड यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची पत्रकार परिषदेत घोषणा

Live Update : जितेंद्र आव्हाड यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पत्रकार परिषदेत घोषणा

रोहित पाटील मुख्य प्रतोद

उत्तर जानकर यांनी प्रतोदपदी निवड

Advertisement
Dec 01, 2024 17:23 (IST)

Live Update : पुणे जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदार शंकर मांडेकर हे भिडे गुरुजींच्या भेटीला

पुणे जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदार शंकर मांडेकर हे भिडे गुरुजींच्या भेटीला

भोर मुळशीचे नवनिर्वाचित आमदार शंकर मांडेकर यांनी  पुण्यात घेतली भिडे गुरुजीची भेट 

आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मांडेकर यांनी घेतली सदिच्छा भेट 

भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Dec 01, 2024 17:21 (IST)

Live Update : काळजीवाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात दाखल

काळजीवाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांनी ठाण्यात दाखल 

Advertisement
Dec 01, 2024 16:43 (IST)

Live Updates: उपमुख्यमंत्रिपदाच्या चर्चेबाबत श्रीकांत शिंदे काय म्हणाले?

काही वेळापूर्वी एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांना पत्रकाराने श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद देणार का, हा प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले यावर चर्चा सुरू आहे. यावरुन श्रीकांत शिंदेंच्या उपमुख्यमंत्रिपदाची शक्यता नाकारली नाही. गृहमंत्रिपदाबाबतही एकनाथ शिंदेंनी चर्चा होईल असं म्हटलंय. आता श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपदाच्या चर्चेबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, या गोष्टीचा विचारच कधी केला नाही. 

Dec 01, 2024 16:33 (IST)

Live Update : एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री बनवावे अन्यथा विधानसभेबाहेर आंदोलन करू - मुस्लीम महिलांचा इशारा

विधानसभा निवडणूक निकालनंतर मुख्यमंत्री पदासाठी महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. कल्याणमध्ये बैल बाजार परिसरात आज मुस्लीम महिलांनी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षाच्या काळात महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवल्यात. यामुळे राज्यातील मुस्लीम महिला सक्षमीकरण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे आमचा भाऊ एकनाथ शिंदेच यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवावे अन्यथा विधनासभेबाहेर मुस्लीम महिला मोठ्या प्रमाणात आंदोलन करतील असा इशारा दिला आहे 

Dec 01, 2024 16:31 (IST)

Live Update : एकनाथ शिंदेंचे उपमुख्यमंत्रिपदाबाबतही मोठे संकेत

Dec 01, 2024 16:29 (IST)

Live Update : बीड विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार संदीप क्षीरसागर यांचा सपत्नीक नागरी सत्कार

बीड मधील सहा विधानसभा मतदारसंघात एकट्या बीड विधानसभेत महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी विजय मिळवला. या विजयानंतर आज बीड शहरात संदीप क्षीरसागर यांचा सपत्नीक भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. खासदार बजरंग सोनवणे यांनी या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावली. 

Dec 01, 2024 15:11 (IST)

NCP Sharad Pawar Group Meeting: राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदारांची बैठक

आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या आमदारांची बैठक...

विधीमंडळ गटनेते निवड तसंच इतर विषयांवर चर्चा होणार...

मुंबईतील बेलर्ड इस्टेट येथिल पक्ष कार्यालयात होणार बैठक…

जयंत पाटील यांसह, आमदार, मुख्य नेते उपस्थितीत राहणार…

गटनेते पदावर जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांची नाव चर्चेत असल्याची माहिती...

Dec 01, 2024 13:53 (IST)

Nanded MIDC Fire: नांदेडच्या सिडको एमआयडीसीत अग्नितांडव, 4 जखमी

नांदेड येथील सिडको  एमआयडीसी मध्ये असलेल्या तिरूमला ऑईल इंडस्ट्रीजला आग लागल्याची घटना आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली आहे. या आगीत  चौघे जखमी झाले आहेत. आगीची माहिती मिळताच  अग्निशमन विभाग तत्काळ घटनास्थळी दाखल होत  आगीवर नियंत्रण मिळवले.  एका स्फोटानंतर दुपारी बारा वाजेच्या सुमारास ही आग लागल्याचे बोलले जात आहे.  नांदेड येथील सिडको भागात असलेल्या एमआयडीसी येथील ही घटना आहे. जखमींना तात्काळ  उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहेत. या चौघांचीही प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे. ही आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नाही.

Dec 01, 2024 13:31 (IST)

Aditya Thackeray: मुख्यमंत्री न ठरवणे महाराष्ट्राचा अपमान: आदित्य ठाकरे

मुख्यमंत्री ठरवता न येणं आणि निकालानंतर आठवडाभराहून अधिक काळ सरकार स्थापन करता न येणं, हा केवळ महाराष्ट्राचा अपमान आहे असं नाही तर त्यांच्याच प्रिय निवडणूक आयोगाने दिलेल्या मदतीचाही अपमान आहे. नियम केवळ विरोधी पक्षांसाठी लागू होतात, पण काही खास लोकांसाठी मात्र ते लागू होत नाहीत, असं स्पष्ट दिसतंय. शपथविधीची तारीख एकतर्फी जाहीर करणं, सरकार स्थापन करण्याचा दावा न करता किंवा आदरणीय राज्यपालांना बहुमत सिद्ध न करता, हे शुद्ध अराजक आहे.  आणि या सर्वांमध्ये, हंगामी मुख्यमंत्री चंद्राच्या स्थितीनुसार आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे सुट्टीवर आहेत. 

दरम्यान, ज्यांना बहुमत मिळालं आहे, ज्यांना सरकार स्थापन करता येऊ शकतं, त्यांच्यासाठी महाराष्ट्र प्राथमिकता नाहीये. ते दिल्लीतल्या दौऱ्यांचा आनंद घेत आहेत.राष्ट्रपती राजवट लागू व्हायला हवी होती का? जर निर्णय प्रलंबित असताना विरोधी पक्षाकडे बहुमत असतं, तर ती लागलीच लागू झाली असती, नाही का? असो, निवडणूक आयोगाच्या मदतीने मिळालेल्या जनादेशामुळे ज्यांना शेवटी शपथ घेण्याची संधी मिळेल, त्यांचे अभिनंदन!

Dec 01, 2024 13:28 (IST)

Pune Satara Highway Accident: पुणे- सातारा महामार्गावर भीषण अपघात, 4 जण जखमी

पुणे-सातारा महामार्गावर देगाव फाटा येथे भरधाव कंटेनर पुलाच्या मध्यभागी अडकल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे.  कार आणि कंटेनर यांच्यात धडक होऊन, कंटेनर थेट पुलाच्या मध्यभागी घुसला.   कंटेनर पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जात असताना अपघात झाला. अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

 

-अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून दोन्हीही वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे.  अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती, घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचत वाहतूक केली सुरळीत.. पुणे-सातारा महामार्गावर देगाव फाटा येथे पुण्याहून साताऱ्याकडे जाणाऱ्या कंटेनर (एमएच 46 बीयू 1863) आणि कार (एमएच 09 जीयू 0334) यांच्यात अपघात झाला.. अधिक तपास राजगड पोलिस करत आहेत.

Dec 01, 2024 13:26 (IST)

Mumbai News: बाळा नांदगावकर यांच्यासह 48 जणांची निर्दोष सुटका, प्रकरण काय?

शिवसेना नेते आमदार अनिल परब, मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव, बाळा नांदगावकर आणि बाळा नर यांच्यासह 48 शिवसैनिकांची सबळ पुराव्यांअभावी कोर्टाकडून निर्दोष सुटका

साल 2005 मध्ये शिवसेना सोडून बाहेर पडलेल्या नारायण राणे यांचीr सामनासमोरील सभा उधळल्याचं प्रकरण

घटना घडून 19 वर्षे उलटल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयानं हा निकाल देत या शिवसैनिकांना मोठा दिलासा दिलाय

साल 2005 मध्ये शिवसेना सोडून  बाहेर पडलेल्या नारायण राणे यांनी प्रभादेवीच्या नागू सयाजी वाडीत सभा आयोजित केली होती

शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'च्या कार्यालयासमोरच ही सभा घेण्यात आली होती

त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी नारायण राणेंच्या निषेधार्थ घोषणाबाजी करून सभा उधळल्याचा आरोप पोलिसांनी केला होता

याप्रकरणी शिवसैनिकांविरुद्ध दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता

Dec 01, 2024 13:24 (IST)

Latur News: साखर पुड्याच्या कार्यक्रमात चोरट्यांनी केले 30 तोळे दागिने लंपास

लातूरच्या एमआयडीसी परिसरात चोरट्याने एका हॉटेल मध्ये साखरपुड्याचा कार्यक्रमात 30 तोळे दागिन्यावर डल्ला मारल्याचा प्रकार घडलाय... एमआयडीसी परिसरातील हॉटेल उत्सव मध्ये साखरपुड्याच्या कार्यक्रमादरम्यान हा डल्ला मारलेला दिसला आहे.. साखरपुड्याचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडल्यानंतर मुलीच्या अंगावरील सोने ठेवलेली बॅग पळवल्याची सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहे.. स्टेजच्या बाजूला 30 तोळे सोन्याचे दागिन्यांची बॅग ठेवण्यात आली होती... चोरट्यांनी हे बॅग लंपास केलीय.. आता पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत..

Dec 01, 2024 13:23 (IST)

Manoj Jarange Patil: 'आरक्षणाचा लढा कायम ठेवणार...', मनोज जरांगे पाटील

राज्यातील सरकार स्थापनेनंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाचे हत्यार उपसणार आहेत. यापूर्वी जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी ते पंढरपूर अशी यात्रा काढली आहे. ही यात्रा बीड शहरात दाखल झाल्यानंतर जरांगे यांचा ताफा पंढरपूरकडे रवाना झाला आहे.या देवदर्शनानंतर जरांगे पाटील अंतरवाली सराटीत सामूहिक बेमुदत उपोषण करणार आहेत. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आरक्षणाचा लढा कायम ठेवणार असल्याच जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.

Dec 01, 2024 11:59 (IST)

Devendra Fadnavis Call Eknath Shinde: देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना फोन, प्रकृतीची विचारपूस

राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती सध्या ठीक नसून ते आपल्या साताऱ्यातील दरे गावी मुक्कामी आहेत. आज देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना फोन करुन विचारपूस केल्याची माहिती समोर आली आहे.

Dec 01, 2024 11:55 (IST)

Kharghar Crime: शिंदे गटाच्या शहरप्रमुखासह कुटुंबियांना मारहाण

खारघरमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या शहरप्रमुखासह त्याच्या कुटुंबियांना शुल्लक कारणावरून करण्यात आली मारहाण.

सीआयएसएफ च्या 10 ते 15 जवानांकडून करण्यात आली मारहाण. सीआयएसएफ च्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसने अचानक डावीकडे बस वळवल्याचा जाब विचारल्याने परब कुटुंबियांना 10 ते 15 जवानांकडून करण्यात आली मारहाण.

शिवसेना शिंदे गटाचे खारघर शहर प्रमुख प्रसाद परब यांच्यासह वाहना मधील इतरांना करण्यात आली मारहाण. परब कुटुंबियांना करण्यात आलेल्या मारहाणी विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास करण्यात येतोय.

Dec 01, 2024 11:46 (IST)

Sanjay Raut Meet Sharad Pawar: संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला

शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत हे शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत.  वाय.बी चव्हाण सेंटर येथे ही भेट होत आहे. दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा होणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

Dec 01, 2024 11:43 (IST)

Yugendra Pawar News: युगेंद्र पवार यांच्याकडून आभार दौऱ्याला सुरुवात

बारामती विधानसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी आभार दौरा सुरू केला आहे. बारामती विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाल्यानंतर आता युगेंद्र पवारांनी गावोगावी जावं मतदारांचे आभार मानायला सुरवात केली आहे.काटेवाडी गावातून या आभार दौऱ्याला त्यांनी सुरुवात केलीय…

Dec 01, 2024 10:56 (IST)

Miraj News: यात्रेत पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुमाकूळ, 20 ते 25 भाविक जखमी

मिरज तालुक्यातील मालगाव येथे बावाफन उरूस निमित्त येणाऱ्या भाविकांवर आणि स्थानिक नागरिक यांच्यावर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करत अनेकांना जखमी केल्याची घटना घडली आहे..ताणंग रस्ता, शास्त्री नगर पाण्याची टाकी, सिद्धार्थ नगर निकम वस्ती , बावा फण दर्गा परिसर या ठिकाणी  पिसाळलेल्या कुत्र्याने भाविकांच्या वर  हल्ला केला आहे, वृद्ध पुरुष , लहान मुले वृद्ध महिला  20 ते25 भाविक आणि स्थानिक नागरिकांचा समावेश आहे   मिरज शासकीय रुग्णालय येथे जखमी झालेल्या नागरिकांवर उपचार सुरू आहेत, सांगली महापालिका क्षेत्रातील भटकी कुत्रीही मोठ्या प्रमाणात मालगाव सुभाषनगर परिसरात सोडली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.मोकाट कुत्र्यांचा योग्य बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.

Dec 01, 2024 10:19 (IST)

Maharashtra Assembly Winter Session: नव्या सरकारचे पहिले अधिवेशन, तारीख ठरली

महायुती सरकारचं पहिलं अधिवेशन नागपूरला!

हिवाळी अधिवेशन १६ ते २१ डिसेंबर दरम्यान पार पडणार

हिवाळी अधिवेशन 5 दिवसांच असणार

प्रश्न उत्तरांचा कालावधी नसल्यानं पहिले अधिवेशन कमी दिवसांचे असणार

पहिल्याच अधिवेशनामध्ये विरोधीपक्ष नेता नसणार

या अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींच्या वाढीव रकमेवर निर्णयाची शक्यता

Dec 01, 2024 09:44 (IST)

Maharashtra Farmer News: चक्री वादळाच्या प्रभावाने बळीराजा चिंतेत

फेंगल चक्रीवादळाचा प्रभावाने राज्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात काल पासून ढगाळ वातावरण असून काही भागात रिपरीप पाऊस पडल्याने धानाचे पूजने वाचवण्यासाठी बळीराजाची धावाधाव झाली होती. सद्या शेतात कापूस, तुळ, हरबरा,पिक उभे आहेत. ढगाळ वातावरणामूळे तूळ पिकावर संकट ओढवले, तुळीला फुलोरा आला आहे. पावसामुळे फुलोरा गळण्याचा धोका उदभवाला असून अळीचा धोका वाढला आहे. मोठा पाऊस झाला तर कापूस काळा पडण्याचा धोका निर्माण आहे, एकीकडे कापूस वेचणीसाठी मजूर मिळेना अशी स्थिती तर दुसरीकडे अस्मानी संकट. या दोन्ही संकटाचा सामना करताना बळीराजा हतबल झाला आहे. पावसापासून धानाचे पुंजने वाचवण्यासाठी बळीराजा रात्र जागून काढत आहे. कापूस वेचणी करणाऱ्या मजुरांचा शोधात बळीराजा गावोगावी भटकताना दिसत आहे.

Dec 01, 2024 08:13 (IST)

Solapur News: आंतरराष्ट्रीय कराटे कॉमनवेल्थ स्पर्धेत महाराष्ट्राला सिल्वर मेडल

आंतरराष्ट्रीय कराटे कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला सिल्वर मेडल मिळाले असून सोलापूरची कन्या आर्या यादव हिने या स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल प्राप्त केले आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेमध्ये अकराव्या कॉमनवेल्थ कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये 39 देशांचा समावेश असून यात भारताकडून 53 किलो वजनापर्यंत असलेल्या स्पर्धकांमध्ये आर्या यादव हिने घवघवीत यश प्राप्त केले आहे.

Dec 01, 2024 07:24 (IST)

Wardha Accident: तळेगावच्या सत्याग्रही घाटात भीषण अपघात, 1 ठार

वर्ध्याच्या तळेगाव येथील सत्याग्रही घाटामध्ये सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा अत्यंत गंभीर असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक अंदाज पुढे आले आहे.विशेष म्हणजे एकदिवस अगोदर त्याच परीसरात झालेल्या अपघातात  एकाचा जागीच मृत्यू झाला होता.

Dec 01, 2024 07:23 (IST)

Ajit Pawar News: 'भावी मुख्यमंत्री अजित पवार...', भल्यामोठ्या बॅनरची चर्चा

भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचे झळकले 20 फुटी बॅनर

 परंडा तालुक्यातील 'सरणवाडी गावात अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर. महायुतीचे उमेदवार  डॉ.तानाजी सावंत हे भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघात विजयी झाल्याबद्दल यांचाही बॅनरवर अभिनंदन केले आहे.  बॅनरच्या वरच्या भागात बाळासाहेब ठाकरे,आनंद दिघे,एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस यांचे बॅनरवर फोटो आहेत

 राष्ट्रवादी काँग्रेसचे मागासवर्गीय विभाग सेलचे जिल्हाध्यक्ष  राजेंद्र जाधव यांनी अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलेला बॅनर लावलाय. 

Dec 01, 2024 07:22 (IST)

Indapur News: इंदापूर तालुक्यात गुलाबी थंडीची चाहूल; गावोगावी शेकोट्या पेटल्या

इंदापूरच्या पश्चिम भागातील नीरा खोऱ्यातील निमसाखर निरवांगी खोरोची बोराटवाडी वालचंदनगर परिसरात गुलाबी थंडीची चाहूल सुरू झाली आहे.ऊस तोडणी कामगारांना या थंडीचा सामना करावा लागत असून गावागावात शेकोट्या पेटू लागल्यात.

Dec 01, 2024 07:21 (IST)

maharashtra Politics: भाजपाकडून गृह मंत्रालय तसच उर्जा खाते एकनाथ शिंदे यांना देण्यास विरोध

भाजपाकडून गृह मंत्रालय तसच उर्जा खाते  एकनाथ शिंदे यांना  देण्यास विरोध - सूत्र

एकनाथ शिंदे हे गृह, उर्जा, जलसंपदा खाते यासाठी आग्रही आहे मात्र गृह मंत्रालय मिळणार नाही थेटच शिंदे यांना भाजपाने कळविल्याची माहिती - सूत्र

मुख्यमंत्री असावे व्यक्तीच गृह मंत्रालय जवळ ठेवणार - सूत्र 

एकनाथ शिंदे यांना पर्यायी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग देण्याची शक्यता - सूत्र

Dec 01, 2024 07:20 (IST)

Worli News: वरळी बहुतेक भागात वीज पुरवठा खंडित

Worli News:

वरळी बहुतेक भागात वीज पुरवठा खंडित.मेट्रो काम करत असताना बेस्ट जमिनीखाली विद्युत पुरवठा करणारी वायर तुटल्याने पहाटे चार वाजता सर्वत्र वीज पुरवठा खंडित. अनेक मोठ्या सोसायटी टाॅवरमध्ये लिफ्टस ही खंडित