अमजद खान, कल्याण
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली आहे. लोकसभेत मित्र म्हणून काम केले. मला लोक बोलत होते की, इथे उमेदवार देणार की नाही. देवाशपथ सांगतो मला हे पटत नव्हते. यांचे माझ्यावर उपकार नको. गेल्या पाच वर्षात मला आणि माझ्या माणसांना जो त्रास दिला आहे. हा त्रास मला कुठेतरी विसरावा लागला असता. यासाठी मला यांचे उपकार नको. अशा शब्दात राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंवर निशाणा साधला. यावेळी टीका करताना राजू पाटील यांनी श्रीकांत शिंदे यांचा बबड्या म्हणून उल्लेख केला.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मनसे आमदार राजू पाटील यांच्या प्रचारासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा डोंबिवली पूर्वेतील पीएनटी कॉलनीत पार पडली. त्यांच्या प्रचाराचा नारळ माजी आमदार रमेश पाटील यांच्या हस्ते आज फोडण्यात आला. यावेळी राजू पाटील यांनी भाषण केले.
राजू पाटील यांनी भाषणाच्या सुरुवातीला नागरिकांची दिलगिरी व्यक्त केली. सभेमुळे लोकांना त्रास सहन करावा लागला. इथल्या सत्ताधाऱ्यांनी सर्व मैदाने बिल्डरांच्या घशात घातली आहेत. त्यामुळे सभा घ्यायला जागाच नाही. कोविडच्या काळात सध्याचे उमेदवार रेशनिंग दुकानातील तांदूळ घेऊन वाटत होते. मी स्वखर्चातून मदत केली. स्वत: माझे रुग्णालय दिले, असं राजू पाटील यांनी म्हटलं.
( नक्की वाचा : अमित की आदित्य? ठाकरे बंधूपैकी कोण जास्त श्रीमंत? निवडणूक प्रतिज्ञापत्रात झालं उघड )
राजू पाटील यांनी यावेळी सुभाष भोईर यांनाही लक्ष केले. भोईर यांनी या भागात टोरंट कंपनी आणली. डायघरचा डंपिंग प्रकल्प आणला. 27 गावे महापालिकेत ढकलली. मतदारसंघात आणलेली कामे ही विरोधासाठी आलेली आहेत. आमच्या भाागातील राजकारण या बाप-बेट्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी बिघडवले आहे. गणपत गायकवाड यांचा विषय असो किंवा त्यांच्या सहकाऱ्यांचा विषय असो. जे घाणेरडे राजकारण केले. त्याचा वचपा मला काढायचा आहे, असं राजू पाटील यांनी म्हटलं.
(नक्की वाचा: "मनोज जरांगेंचा निर्णय आमच्यासाठी योग्य", शरद पवारांनी उलगडून सांगितलं)
मला माहिती होते हे लोक काम करणार नाही. माझे सहकारी बोलत होते. तुम्हाला सीट सोडणार नाही. मला शब्द दिला होता श्रीकांत शिंदे यांनी तुम्ही माझ्यासाठी काम करा, मी तुमच्या गावाकरिता बाबांकडून निधी आणेन. केडीएमसीच्या हक्काचे पाणी ठाण्याला जाते. हा पाणी कोटा आपल्या हक्काचा आहे. या लोकांना तो ठाण्याला पळवून न्यायचा आहे. हे चोरच आहेत. आमदार असो की, पाणी ते चोरणारच असा निशाणा राजू पाटील यांनी साधला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world