जाहिरात

Sharad Pawar News: पवार कुटुंबाचा यंदा दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय, कारण...

Sharad Pawar News: पवार कटुंबीय यंदा दिवाळी का साजरी करणार नाही? सुप्रिया सुळे यांनी सांगितले कारण...

Sharad Pawar News: पवार कुटुंबाचा यंदा दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय, कारण...
"Sharad Pawar News: पवार कुटुंब दिवाळी का साजरी करणार नाही?"
IANS English

Sharad Pawar News: पवार कुटुंबीयांनी यंदा दिवाळी (Diwali 2025) साजरी न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी दिलीय. सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी (16 ऑक्टोबर) सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भातील माहिती शेअर केलीय. दिवाळी साजरी न करण्यामागील कारण देखील पोस्टमध्ये नमूद केलंय.

सुप्रिया सुळे यांनी पोस्टमध्ये नेमके काय म्हटलंय?

सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, "आमच्या काकी सौ भारती प्रतापराव पवार यांचे नुकतेच निधन झाले. त्या आम्हा सर्वांसाठी आईसमान होत्या. म्हणूनच आम्ही सर्व पवार कुटुंबीयांनी मिळून यावर्षीची दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दरवर्षी गोविंदबाग, बारामती येथे होणारी दिवाळी आणि दिवाळीच्या पाडव्यानिमित्त होणारा सहृदांच्या भेटीचा कार्यक्रम देखील यावर्षी होणार नाही, कृपया आपण सर्वांनी याची नोंद घ्यावी. आपणा सर्वांना ही दिवाळी आनंदाची, सुखसमृद्धीची आणि भरभराटीची जावो ही सदिच्छा."

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांचे छोटे भाऊ प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार (वय 77 वर्षे) यांचे यंदा मार्च महिन्यामध्ये निधन झाले होते.  

(नक्की वाचा: Pune News: पुरंदर एअरपोर्ट वादात आता शरद पवारांची उडी, केलं मोठं वक्तव्य)

(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com