गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबईसह (Mumbai Rain Update) उपनगरात सुरू असलेल्या पावसाने आज 16 जुलैपासून उसंत घेतली आहे. मात्र सकाळी पावसाने दडी मारली असली तरी मुंबई शहरात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उत्तर कोकण-गोव्यातील जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण-गोवा, उत्तर मध्य जिल्ह्यांत बहुतांश ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा - Kokan Railway : प्रवाशांचे हाल, 14 तासांनंतरही कोकण रेल्वेची वाहतूक ठप्पच!
महाराष्ट्र आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
15 Jul, 2.15 pm, Mumbai recd widespread light-mod rainfall in past 6 hrs with RF picking up last 3 hrs towards Western suburbs;40-50 mm.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 15, 2024
Latest Mumbai radar obs indicate mod intensity clouds over city and off the coast of Raigad.
Possibility of RF to continue for next 2,3 hrs. pic.twitter.com/4PPVJKee5a
मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याशिवाय कमाल आणि किमान तापमान 30 अंशाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world