
एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात पुन्हा सरकार स्थापन करावे, अशी इच्छा शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद व्यक्त केली आहे. IANS शी बोलताना त्यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत हे विधान केले. महाराष्ट्रात सध्या जे सरकार आहे ते परत यावे, असं त्यांनी म्हटलं.
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी पुढे म्हटलं की, "मला महाराष्ट्राच्या भवितव्याबद्दल फारशी माहिती नाही, मी निवडणूक पंडितही नाही. मला निवडणुकीच्या राजकारणाचीही फारशी माहिती नाही. पण, सरकार तिथे काम करत आहे. या सरकारने गायीला मातेचा दर्जा दिला आहे. जर हे सरकार पुन्हा सत्तेत आलं तर एक आदर्श व्यवस्था देखील केली जाईल. जी संपूर्ण देशाला आणि संपूर्ण जगाला मार्ग दाखवेल.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उद्धव ठाकरेंच्या प्रश्नावर ते म्हणाले की, मी इतर कुणावरही बोलणार नाही. पण देशाच्या स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतरही एकनाथ शिंदे यांनी जे काम केले आहे, ते कोणत्याही इतर मुख्यमंत्र्याने केले नाही.
( नक्की वाचा : Vote Jihad : 'व्होट जिहाद'च्या आरोपांना उत्तर देताना ओवैसींना आठवले पूर्वज, म्हणाले... )
संत समाजाच्या राजकारणावर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, "आम्ही कोणती निवडणूक लढवत आहोत? की मुख्यमंत्रिपदावर बसलो आहोत? कोणाला मत द्यायचं आणि कोणाला मत द्यायचं नाही यावर आमची मते मांडण्याचा आम्हाला अधिकार आहे. एखाद्या नेत्याने चांगले काम केले तर त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. गाईला मातेच्या दर्जा देऊन एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण भारतातील करोडो हिंदूंचं मन जिंकलं आहे.
(नक्की वाचा: भाजपाचे माजी मंत्री मराठा मतांवर 'हे' काय म्हणाले.... नवा वाद पेटणार?)
कुंभमेळ्यात मुस्लिमांच्या 'नो एंट्री'वर शंकराचार्य म्हणाले, "कोण मुस्लिम आणि कोण हिंदू हे ओळखणे आता कठीण झाले आहे. आता लोक धर्मांतरही करतात, पण नाव बदलत नाहीत. कुंभमेळा हा धार्मिक सण आहे. यात गंगास्नानाचे पुण्य आहे आणि पापांचा नाश होतो. इस्लाममध्ये असे काही नाही आणि म्हणून त्यांच्या कुंभात येण्यात काही अर्थ नाही."
(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world