जाहिरात

चिमुरडीच्या शरीरावरील जखमा सायकलमुळे झाल्या असतील, 'त्या' शाळेच्या मुख्याध्यापिकेचा संतापजनक दावा

पीडितेचे पालक जेव्हा चिमुरडीच्या शरीरावरील खुणांची तक्रार घेऊन शाळेत गेले होते, त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिकेने धक्कादायक प्रतिक्रिया दिली.

चिमुरडीच्या शरीरावरील जखमा सायकलमुळे झाल्या असतील, 'त्या' शाळेच्या मुख्याध्यापिकेचा संतापजनक दावा
बदलापूर:

बदलापुरातील (Badlapur School) एका शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेने (Child Abuse) अख्खा महाराष्ट्र हादरला. अवघ्या साडे तीन ते चार वर्षांच्या चिमुरड्यांसोबत शाळेत घडलेल्या या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान या प्रकरणात शाळा प्रशासन आणि पोलिसांकडून चालढकल केल्याचा आरोप पीडितेच्या पालकांकडून केला जात आहे. त्याचाच परिपाक म्हणजे मंगळवारी बदलापुरातील जनतेचा आक्रोश पाहायला मिळाला. 

दरम्यान या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडितेचे पालक जेव्हा चिमुरडीच्या शरीरावरील खुणांची तक्रार घेऊन शाळेत गेले होते, त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिकेने धक्कादायक प्रतिक्रिया दिली. चिमुरडीच्या शरीरावरील जखमी सायकल चालविल्याने झाल्याचा असतील असा दावा त्या शाळेच्या मुख्याध्यापिकेने केल्याचं लोकसत्ताने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे. भयंकर म्हणजे या प्रकरणात पोलिसांनी धमकावल्याचा आणि छळ केल्याचा आरोप पीडितेच्या पालकांनी केला आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ आणि १३ ऑगस्टला  शाळेच्या सफाई कर्मचाऱ्याने दोन बालिकांवर कथितरित्या लैंगिक अत्याचार केले. यातील एका मुलीच्या पालकांनी तिला खासगी रुग्णालयात नेले. तपासणीत तिच्या गुप्तांगाल सूज आल्याचं समोर आलं. यानंतर १६ ऑगस्ट रोजी पालक तो रिपोर्ट घेऊन शाळेत गेले असता शाळेच्या मुख्याध्यापकांनी सायकलमुळे जखम झाली असावी किंवा बाहेर काही घडले असावे असं म्हणत हा दावा फेटाळून लावला. त्यानंतर पालक तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले. तेथेही त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही. शेवटी मनसे नेत्याच्या मध्यस्थीमुळे तब्बल बारा तासांनी गुन्हा नोंदविण्यात आला. येथे काही पोलिसांनी त्यांना धमकावल्याचा पालकांचा आरोप आहे. 

नक्की वाचा - बदलापूरची 'ती' शाळा अद्याप बंदच, विद्यार्थी - पालकांची सरकारकडे मोठी मागणी

शाळा-पोलिसांचं साटंलोटं...
हे प्रकरण बाहेर येऊ नये यासाठी महिला पोलिसांनी शाळेच्या व्यवस्थापनासोबत गुप्त बैठक घेतल्याचा पीडितेच्या कुटुंबीयांचा आरोप असल्याचं लोकसत्ताच्या वृत्तात म्हटलं आहे. म्हणूनच पोलीस ठाण्यात पीडितेच्या पालकांना बारा तास प्रतीक्षा करावी लागली, शिवाय रुग्णालय प्रशासनाने सहकार्य केलं नसल्याचा पालकांचा आरोप आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com