जाहिरात

IPL 2025 Eliminator : 4 मुद्दे, 2 मुंबईच्या बाजूने 2 गुजरातच्या...आजच्या सामन्यात कोण मारेल बाजी?

मुंबई आणि गुजरात या दोन्ही संघांकरता हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या सामन्यात जो संघ हरेल त्याचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात येणार आहे. गुणतालिकेत अखेरच्या दिवसापर्यंत रंगलेल्या चढाओढीत गुजरातचा संघ तिसऱ्या तर मुंबईचा संघ चौथ्या स्थानावर राहिला होता.

IPL 2025 Eliminator : 4 मुद्दे, 2 मुंबईच्या बाजूने 2 गुजरातच्या...आजच्या सामन्यात कोण मारेल बाजी?
मुंबई:

चंदीगढच्या मुल्लनपूर येथील मैदानावर आज आयपीएलच्या प्लेऑफ्समधला पहिला एलिमिनेटर सामना खेळवला जाणार आहे. मुंबई आणि गुजरात या दोन्ही संघांकरता हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या सामन्यात जो संघ हरेल त्याचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात येणार आहे. गुणतालिकेत अखेरच्या दिवसापर्यंत रंगलेल्या चढाओढीत गुजरातचा संघ तिसऱ्या तर मुंबईचा संघ चौथ्या स्थानावर राहिला होता.

दोन्ही संघांची यंदाच्या हंगामातली कामगिरी ही चढ-उताराची राहिली आहे. मोक्याच्या क्षणी मुंबईच्या संघाने स्पर्धेत उसळी मारत प्ले-ऑफ्सचं तिकीट मिळवलं. दुसरीकडे गुजरातच्या संघाची यंदाच्या हंगामातली सुरुवात चांगली झाली...पण नंतरच्या काही सामन्यांमध्ये त्यांची गाडी घसरली. परंतु योग्य वेळेत स्वतःला सावरत गुजरातने स्पर्धेत प्लेऑफ्सचं तिकीट मिळवलं.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महत्त्वाच्या खेळाडूंचं स्पर्धेबाहेर जाणं ठरु शकतं दोन्ही संघांसाठी धोकादायक -

गुजरातचा सलामीवीर जोस बटलर हा माघारी परतल्यामुळे त्याच्या जागेवर गुजरातने कुशल मेंडीस या श्रीलंकेच्या फलंदाजाला संधी दिली आहे. जोस बटलरने यंदाच्या हंगामात आपल्या फलंदाजीच्या जोरावर अनेक सामन्यांमध्ये गुजरातला विजय मिळवून दिलाय. त्याला सलामीवीर साई सुदर्शन आणि कर्णधार शुबमन गिलचीही उत्तम साथ मिळाली आहे. दुसरीकडे मुंबईच्या संघातूनही विल जॅक्स आणि रिकल्टन हे दोन महत्वाचे फलंदाज माघारी परतले असून त्यांच्या जागेवर जॉनी बेअरस्टोला, चरिथ असलंका यांना संधी देण्यात आली आहे.

परंतु सूर्यकुमार वगळता एकाही फलंदाजाच्या कामगिरीत सातत्य नसणं आणि त्यात संपूर्णपणे दोन नव्या खेळाडूंना संघात संधी दिल्यामुळे मुंबईच्या प्लेईंग 11 चं गणित या सामन्यात बिघडण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा  - IPL Playoffs | मुंबईसाठी चिंतेचे ढग पण 'तो' योगायोग जुळून आल्यास 'हिटमॅन' शर्मा ठरु शकतो तारणहार

कोणते मुद्दे गुजरातच्या बाजूने, कोणते मुद्दे मुंबईच्या बाजूने?

1) IPL च्या इतिहासात हार्दिक पांड्याने शुमबन गिलला 23 बॉलमध्ये 4 वेळा बाद केलंय. ज्यात त्याने 19 रन्स दिल्यात. आजच्या सामन्यात हा योगायोग जुळून आल्यास गुजरातच्या अडचणी वाढू शकतात.

2) जोस बटलरच्या जागेवर संधी मिळालेला कुशल मेंडीस हा टी-20 क्रिकेटमध्ये मिचेल सँटनरविरुद्ध नेहमी चाचपडत आला आहे. 39 बॉलमध्ये 34 रन्स देऊन सँटनरने मेंडीसला 4 वेळा बाद केलं आहे.

3) संपूर्ण टी-20 क्रिकेटमध्ये सूर्यकुमारने राशिद खानच्या गोलंदाजीवर एकदाही बाद न होता 77 बॉलवर 117 धावा केल्या आहेत. परंतु मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्यासोबतच्या द्वंद्वात राशिद खानचं पारडं हे नेहमी जड राहिलं आहे. 44 बॉलमध्ये 32 धावा देत राशिदने आतापर्यंत दोनवेळा हार्दिकला बाद केलं आहे.

हे ही वाचा -  Rohit Sharma : रोहित शर्माची खास विनंती मान्य, बीसीसीआयकडून जुन्या सदस्याचा टीम इंडियात समावेश!

4) IPL मध्ये तिलक वर्माने प्रसिध कृष्णाविरुद्ध 7 बॉल खेळले आहेत, ज्यापैकी दोन बॉलवर तो बाद झाला आहे आणि एकदाही तिलक वर्मा प्रसिधविरुद्ध रन काढू शकलेला नाहीये.

हे ही वाचा - MI vs GT : मुंबई इंडियन्सच्या दोन दिग्गज खेळाडूंनी बांधली गुडघ्याला पट्टी, हार्दिकची डोकेदुखी वाढली

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com