जाहिरात
Story ProgressBack

ड्रग्ज विकणारी आजी अटकेत, साडेपाच लाखाचे ड्रग्ज जप्त

पोलिसांनी एका 65 वर्षांच्या महिलेला अटक केली आहे. शाळा, कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना ती अंमली पदार्थ विकण्याचे काम करत होती.

Read Time: 2 min
ड्रग्ज विकणारी आजी अटकेत, साडेपाच लाखाचे ड्रग्ज जप्त
कल्याण:

'म्यूल' नावाच्या एका हॉलीवूड चित्रपटमध्ये एक वेगळी कथा हाताळण्यात आली होती. अमेरिकेत 90 वर्षांच्या एका व्यक्तीला अंमली पदार्थांची वाहतूक करताना पकडण्यात आलं होतं. त्यावर आधारीत लेखावर हा चित्रपट बेतलेला आहे. वयोवृद्ध असल्याने या व्यक्तीचा कोणाला संशय येत नव्हता, त्याचा फायदा उचलत त्याने अंमली पदार्थांची तस्करी करणं सुरू ठेवलं होतं. सत्य घटनेवर आधारीत 'म्यूल' चित्रपटात अभिनेते क्लिंट इस्टवूड यांनी वयोवृद्ध तस्कराची भूमिका साकारली होती. हे सांगण्याचं कारण म्हणजे अशीच एक घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. पोलिसांनी एका 65 वर्षांच्या महिलेला अटक केली आहे. शाळा, कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना ती अंमली पदार्थ विकण्याचे काम करत होती. 

सलमा शेख असं अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव असून ती कल्याण पूर्वेतील हनुमाननगरात राहते. 2015 साली अंमली पदार्थांच्या विक्री प्रकरणी पोलिसांनी अटक केली होती आणि  तिची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. तुरुंगातून सुटल्यानंतर सलमाने पुन्हा अंमली पदार्थ विकण्यास सुरुवात केली. सलमा ही वयोवृद्ध असल्याने तिच्यावर सहसा कोणाला संशय जात नव्हता, याचा फायदा उलचत ती अंमली पदार्थ विकत होती. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी सलमावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. 

शाळेच्या छतावरून 1 महिना पाळत

सलमा काय करते, कोणाला भेटते, अंमली पदार्थ कसे देते हे पाहण्यासाठी पोलिसांनी शाळेची एक इमारत निवडली होती. या शाळेच्या छतावरून पोलीस सलमावर पाळत ठेवत होते. महिनाभर पाळत ठेवल्यानंतर पोलिसांनी सलमाची सगळी माहिती गोळा केली त्यानंतर सलमाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. पोलिसांनी सलमाकडून 5 लाख 50 हजार रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. सलमान शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ पुरवत होती.

आणखी वाचा - 

पोलीस की घरगडी? एक याचिका अन् धक्कादायक माहिती समोर

छत्तीसगडमध्ये खोल दरीत बस कोसळून भीषण दुर्घटना, 12 जणांचा मृत्यू

'आधी पाणी द्या, मग मत मागा' गावागावात पाणी प्रश्न पेटणार?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination