
प्रसाद शिंदे, अहिल्यानगर: राज्यात गुन्हेगारी घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अगदी क्षु्ल्लक कारणावरुन खून, मारामारीच्या घटना घडत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना अहिल्यानगरमध्ये घडली आहे. अहिल्यानगर शहरात चेष्टा मस्करीतून झालेला वाद अन् मारहाणीमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना घडली आहे. जिशान खान असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात दोन युवकांमध्ये चेष्टा मस्करी सुरु असतानाच राग आल्याने वाद झाला. या वादातून एकाने मित्रावर कात्रीने हल्ला चढवला. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. 29 नोव्हेंबर) घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
नक्की वाचा: बाबा आढाव यांची भेट अन् उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा; 'मविआ'चा प्लॅन सांगितला
समोर आलेल्या माहितीनुसार, दोन युवक मित्र मेडिकलमध्ये चेष्टा करत उभे असताना अचानक राग येऊन शमसुद्दीन खान याने जीशान खान या मित्रावरच कात्रीने हल्ला चढवला होता. या घटनेनंतर जखमी जिशान खान याला शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारर्थ दाखल करण्यात आले होते. मात्र आज सकाळी उपचारादरम्यान जिशान खान या तरुण युवकाचा मृत्यू झाला. या भयंकर घटनेचे सीसीटिव्ही फुटेजही सध्या समोर आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर हल्ला करणारा शमसुद्दीन खान हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. दरम्यान, किरकोळ चेष्टेतून तरुणाचा जीव गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. फक्त चेष्टा मस्करीतून निर्घृण खून केल्याने तरुणाई कोणत्या दिशेने चालली आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
महत्वाची बातमी: EVM मध्ये 15% मतं सेट केली गेली? शरद पवारांनी दिलं भन्नाट उत्तर
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world