जाहिरात

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस स्टेशनला ठाणेदाराकडून 'चांदी'; एका फोटोने उडवली खळबळ!

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण पोलीस दलातील एका पोलीस स्टेशनमध्ये घडलेल्या एका वेगळ्या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस स्टेशनला ठाणेदाराकडून 'चांदी'; एका फोटोने उडवली खळबळ!
Chhatrapati Sambhajinagar : ही चांदीची नाणी कुठून आणली? हा प्रश्न विचारला जात आहे.
छत्रपती संभाजीनगर:

Chhatrapati Sambhajinagar News : देशभरात दिवाळीचा उत्साह असताना, छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण पोलीस दलातील एका पोलीस स्टेशनमध्ये घडलेल्या एका वेगळ्या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. बिडकीन पोलीस स्टेशनचे ठाणेदार (इन-चार्ज) निलेश शेळके यांनी चक्क आपल्या पोलीस स्टेशनमधील सर्व कर्मचाऱ्यांमध्ये चांदीच्या नाण्यांचे वाटप करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, चांदीची ही नाणी नेमकी कुठून आणली आणि यासाठी पैसा कोणाचा वापरला गेला, या अनुत्तरीत प्रश्नांमुळे सहायक पोलीस निरीक्षक शेळके अडचणीत आले आहेत. संभाजीनगरच्या पोलीस अधिक्षकांनीही या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं जाहीर केलंय. 

नेमके काय घडले?

छत्रपती संभाजीनगर शहरापासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या बिडकीन पोलीस स्टेशनचे इंचार्ज निलेश शेळके यांनी दिवाळीच्या निमित्ताने हा उपक्रम राबवला. त्यांनी आपल्या पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांना चांदीची नाणी वाटून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

( नक्की वाचा : Pune News : पुण्याच्या मॉर्डन कॉलेजमुळे मराठी तरुणानं लंडनमधील नोकरी गमावली? प्राचार्यांनी दिलं उत्तर )
 

व्हायरल फोटोमुळे प्रश्न

हे नाणी वाटप करताना पोलीस कर्मचाऱ्यांसोबत ठाणेदार शेळके यांचे फोटोसेशनही झाले. यातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण चव्हाट्यावर आले. पोलीस दलात या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नाणी वाटपामागील हेतू चांगला असला तरी, चांदीची नाणी कुठून आली, यासाठी खर्च झालेला पैसा कोणाचा होता, याबाबत स्पष्टता नसल्याने गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

( नक्की वाचा : Pune News: पुण्यात ऐन दिवाळीत प्रवाशांची लूट, 400 ऐवजी 800 रुपये तिकीट! परिवहन मंत्री कधी लक्ष देणार? )
 

पोलीस दलात चर्चा आणि खळबळ

स्थानिक माध्यमांनी या घटनेची बातमी दाखवल्यानंतर बिडकीन पोलीस ठाण्यातील या चांदीच्या नाणी वाटप प्रकरणाची चर्चा पोलीस दलात सुरू आहे. अनेक कर्मचारी बिडकीन पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना गंमतीने 'नाणी मिळाली का?' असे विचारत असल्याचेही समोर आले आहे.या सर्व प्रकरणानंतर ठाणेदार शेळके अडचणीत आले आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस अधिक्षकांनी या प्रकरणात चौकशी करणार असल्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या चौकशीनंतर या प्रकरणातील नेमकं सत्य समोर येणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com