जाहिरात

Cidco Corruption : लाचखोरीत अडकलेल्या अधिकाऱ्याकडे लाच मागितली, सिडको कर्मचारी अटकेत

Corrupt Cidco Employees Union President Arrested : सिडको एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष नरेंद्र हिरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) शुक्रवारी रात्री सापळा रचून रंगेहाथ पकडले.

Cidco Corruption : लाचखोरीत अडकलेल्या अधिकाऱ्याकडे लाच मागितली, सिडको कर्मचारी अटकेत
नवी मुंबई:

सिडकोमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप अनेकदा ऐकू येतो. सिडकोतील भ्रष्ट कारभाराचा आणखी एक नमुना पुढे आला आहे. लाचखोरीच्या आरोपाखाली निलंबित अधिकाऱ्याकडून सिडकोतल्याच एका कर्मचाऱ्याने लाच मागितल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या लाचखोर कर्मचाऱ्याला अटक केली आहे. (CIDCO Employee Caught Demanding Bribe) नरेंद्र हिरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) शुक्रवारी रात्री सापळा रचून रंगेहाथ अटक केली. धक्कादायक बाब ही आहे की, हिरे हा सिडको एम्प्लॉईज युनियनचा अध्यक्ष आहे. 

(नक्की वाचा: मुलीवरुन चिडवल्याचा राग, जिगरी मित्रानेच दोस्ताला संपवलं)

प्रकरण नेमकं काय आहे? (Why was a CIDCO employee arrested?)

सिडकोचा कार्यकारी अभियंता कल्याण पाटील याला काही महिन्यांपूर्वी लाच घेतल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. या प्रकरणानंतर सिडको प्रशासनाने त्याला निलंबित करून त्याच्या विरोधात खातेनिहाय चौकशी सुरू केली होती. या चौकशीतून स्वतःला निर्दोष घोषित करण्यासाठी, किंवा काही मदत मिळावी, यासाठी कल्याण पाटीलवर नरेंद्र हिरे याने दबाव टाकून ₹1.5 लाख लाचेची मागणी केली. मात्र पाटीलने लाच द्यायची नसल्याने एसीबीकडे याप्रकरणाची तक्रार केली होती. 

(नक्की वाचा:संध्या पाठक मृत्यू प्रकरणाचं सत्य समजणार? पोलिसांना सापडला मोठा पुरावा )

ACB ने कसा रचला सापळा? (How was the CIDCO corruption uncovered?)

पाटीलने दिलेल्या तक्रारीनंतर ACB नवी मुंबई युनिटने शुक्रवारी सिडको मुख्यालयात सापळा रचला होता. ठरल्याप्रमाणे पाटीलने हिरे याला पैसे दिले, आणि त्याच क्षणी ACB अधिकाऱ्यांनी कारवाई करत नरेंद्र हिरे याला रंगेहाथ पकडले. या धडक कारवाईमुळे संपूर्ण सिडको प्रशासनात आणि कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. युनियनचा अध्यक्षच भ्रष्टाचार करत असल्याचे समोर आल्याने कर्मचारी संघटनांच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नरेंद्र हिरे याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 (सुधारित 2018) अंतर्गत सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हिरे याने सिडकोतल्या आणखी दोन कर्मचाऱ्यांची नावे सांगून सगळ्यांचे मिळून 4.5 लाख रुपये मागितले होते. हिरेने ज्या कर्मचाऱ्यांची नावे सांगितली आहेत त्यांचा यात खरोखर समावेश आहे का याचा पोलीस शोध घेत आहेत. हिरेला न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्याचे अन्य कोणी साथीदार आहेत का हे शोधून काढण्यासाठी त्याला ACB कोठडी  मिळावी अशी मागणी करण्यात येणार आहे. हिरे याने यापूर्वीही लाच घेतली होती का याचाही एसीबीला शोध घ्यायचा आहे.  

लाच दिल्याशिवाय सिडकोत काम होत नाही! भगत

सिडको हे भ्रष्टाचाराचे कुरण बनले असून इथे लाच दिल्याशिवाय कामं होत नाही असा आरोप करण्यात येतो.  सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांनी म्हटलंय की,  साडेबारा टक्के, इस्टेट, अतिक्रमण या विभागांमध्ये मोठा भ्रष्टाचार चालू आहे, तसेच पैसे दिल्या शिवाय सिडकोत कामं होत नाही.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com