
अमजद खान
तुमच्याकडे व्हेल माशाची उलटी आहे ना ? ते विकण्यासाठी आमच्याकडे या. असे गोड बोलून तिघांना मानपाडा येथे येण्यास सांगितले. त्यानंतर ते तिघे जण मानपाडा येथे पोहचले. ते तिघेही कारने आले होते. त्यांच्या या कारला कल्याण क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी घेरले. त्यावेळी या तिघांना खात्री झाली की कोणी ही व्हेल माशाची उलटी विकत घेण्यासाठी आले नाहीत तर ते पोलिस आहेत. मग पोलिसांनी या तिघांकडून जवळपास 6 कोटी 22 लाख 25 हजाराची उलटी जप्त केली. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कल्याण क्राईम ब्रांच पोलिसाना एक माहिती मिळाली होती. पनवेलमधील तीन लोक व्हेल माशाची उलटी विकण्याच्या तयारीत आहेत. मात्र त्यांना ग्राहक मिळत नाही. अखेर त्यांना ग्राहक मिळाला. तिघांना फटाफट व्हेल माशाची उलटी एका ठिकाणी एकत्रित केली. त्यानंतर व्हेल माशाची उलटी घेवून ते कारमधून निघाले. ते तिघे डोंबिवलीच्या दिशेने निघाले. मानपाडा परिसरात येऊन या तिघांनी उलटी खरेदी करणाऱ्या त्या व्यक्तिला फोन केला.
ट्रेंडिंग बातमी - रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, पाहा वेळापत्रक
फोन केल्यानंतर ती व्यक्ती समोर आली. भेट झाल्यानंतर व्हेल माशाची उलटी कुठे आहे अशी विचारणा संबधिताने केली. मग त्या तिघांनीही उलटी दाखवली. हे सर्व सुरू असताना तिथे पोलिस धडकले. हे काय होत आहे याची कल्पना या तिघांनाही सुरूवातीला आली नाही. मात्र आपण आता अकडलो गेलोय हे त्यांना समजायला वेळ लागला नाही. त्यांना घेरणारे दुसरे तिसरे कोणी नव्हते तर कल्याण पोलिस होते.
ट्रेंडिंग बातमी - मतदाना आधी निवडणूक आयोगाची चिंता, विधानसभेची तयारी कशी?
पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्या आरोपीमध्ये अनिल भोसले, अंकुश माळी आणि लक्ष्मण पाटील यांचा समावेश आहे. हे तिघे ही पनवेल परिसरात राहणारे आहेत. त्यांचा ग्राहक दुसरा तिसरा कोणी नसून क्राईम ब्रांचाच पोलिस होता. क्राईम ब्रांचचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. व्हेल माशाची उलटी या तिघांकडे कशी आली. त्यांच्या मागे आणखीन कोण आहेत का,याचा तपास कल्याण क्राईम ब्रांच करीत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world