जाहिरात

रात्रभर CCTV चा तपास, तुटलेल्या इयरफोनमुळे मिळाली टीप, कलकत्ता हत्याकांडात आरोपीला कशी झाली अटक?

या रुग्णालयातील निवासी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची निघृण हत्या झाल्याने संपूर्ण राज्यात संताप व्यक्त होत आहे.

रात्रभर CCTV चा तपास, तुटलेल्या इयरफोनमुळे मिळाली टीप, कलकत्ता हत्याकांडात आरोपीला कशी झाली अटक?
कलकत्ता:

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्याकांडामुळे (West Bengal doctor raped and murder) संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. महिला डॉक्टरसोबत जे कृत्य करण्यात आलं ते पाहून कुणाचाही संताप होईल. या प्रकरणात पोलिसांनी संजय रॉयला अटक केली आहे. त्याला 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.

आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये महिला चेस्ट रोग विभागात ट्रेनी डॉक्टर होत्या. एसआयटीने शुक्रवारी रात्री उशीरा चौकशीसाठी 33 वर्षीय आरोपीला ताब्यात घेण्यात आलं. दरम्यान या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी महिला डॉक्टरचा मृतदेह सापडल्यानंतर तपास सुरू झाला होता. यावेळी आपात्कालिन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील सेमिनार रूममध्ये एक तुटलेला इयरफोन सापडला. जवळच महिलेचा मृतदेह होता. पोलिसांनी या इयरफोनवरून तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संजय रॉयला पहाटे 4 वाजता आपल्या गळ्याभोवती ब्लूटूथ डिव्हाइससह आपात्कालिन इमारतीत शिरताना पाहिलं आहे. मात्र 40 मिनिटांनंतर संजय इमारतीबाहेर आला तेव्हा त्याच्या गळ्याभोवती इअरफोन नव्हते. यानंतर या डिव्हाइसने त्याचा फोन जोडण्यात आला.  

कोण आहे संजय रॉय?
2019 मध्ये संजय रॉयची भरती झाली होती. तो के.आरजी. कर रुग्णालयातील पोलीस चौकीत तैनात होता. तो बऱ्याच काळापासून येथे काम करीत असल्याने प्रत्येक विभागाबद्दल त्याला सविस्तर माहिती होती.   

रुग्णालयात नेमकं काय घडलं? 
या रुग्णालयातील निवासी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची निघृण हत्या झाल्याने संपूर्ण राज्यात संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी सांगितले की, महिला डॉक्टरवर बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आली. पीडितेच्या गुप्तांगातून रक्त वाहत होते. तिचे दोन्ही डोळे आणि तोंडातून रक्त येत होतं. चेहरा, पोट, पाय, मान, हात, ओठावर जखमा आढळल्या आहेत. ही घटना सकाळी तीन ते सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. ही पीडिता चेस्ट रोग चिकित्सा विभागात प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून कार्यरत होती. तिच्या शरीरावर झालेल्या जखमा पाहता तिने जोरदार प्रतिकार केला असावा, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

नक्की वाचा - 5 किलो बटाट्याची मागितली लाच, तीनवर ठरलं; पोलिसाची ऑडिओ क्लिप व्हायरल

या घटनेच्या निषेधार्थ हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. कोलकाता येथील आर. जी. कर रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात निवासी महिला डॉक्टरचा अर्धनग्न मृतदेह शनिवारी सापडला. या हत्येच्या विरोधात कोलकाता व प. बंगालमध्ये संतापाचे वातावरण आहे. कोलकात्यात डॉक्टर व नर्सेस रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.

या प्रकरणी डाव्यांची विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरली असून भाजपनेही सीबीआय चौकशीची मागणी केली. या हत्येविरोधात संपूर्ण बंगालमध्ये रविवारी रास्ता रोको करण्याची घोषणा डाव्या विद्यार्थ्यांच्या संघटनेने केली.

दोषींना फासावर लटकवणार - मुख्यमंत्री
हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवणार असून दोषींना फासावर चढवणार असल्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी  सांगितले. बॅनर्जी यांनी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. 

तपासासाठी एसआयटीची स्थापना
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पीडित महिला डॉक्टरच्या मानेचे हाड मोडले आहे. पहिल्यांदा या महिलेचा पहिला गळा दाबला असावा. शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा असून त्यामुळे गुन्हेगारांचा शोध घेण्यास मदत मिळू शकेल, असंही पोलिसांनी सांगितलं. या घटनेच्या चौकशीसाठी कोलकाता पोलिसांनी 'एसआयटी (विशेष चौकशी पथक) स्थापन केले आहे. दरम्यान माझ्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली. आता सत्य लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप पीडितेच्या पित्याने केला.

 
 

Switch To Dark/Light Mode
Previous Article
ग्राहकांच्या 'त्या' यादीवरुन वाधवान यांची IBBI कडे धाव; ग्राहकांनी मात्र फेटाळले सर्व दावे
रात्रभर CCTV चा तपास, तुटलेल्या इयरफोनमुळे मिळाली टीप, कलकत्ता हत्याकांडात आरोपीला कशी झाली अटक?
Citizens protest in the case of sexual abuse of school children in Badlapur
Next Article
चिमुरडीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी बदलापूरकर संतप्त; शाळेच्या गेटवर पालकांसह नागरिकांना रोखलं