जाहिरात

111 वर्षाच्या आजी! घरातून नाही थेट मतदान केंद्रावर जाऊन मतदान

मतदानासाठी तरूण बाहेर पडताना दिसत नाही. अशा वेळी गडचिरोलीत 111 वर्षांच्या आजीने थेट मतदान केंद्रावर येवून मतदान केले आहे.

111 वर्षाच्या आजी! घरातून नाही थेट मतदान केंद्रावर जाऊन मतदान
गडचिरोली:

विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. शहरी भागात मतदारांमध्ये उत्साह हवा तसा दिसत नाही. तर दुसरीकडे ग्रामिण भागात मात्र मोठ्या प्रमाणात मतदान होत आहे. त्यातही गडचिरोली सारख्या आदिवासी जिल्हा असलेल्या मतदार संघात आतापर्यंत सर्वात जास्त मतदान झाले आहे. मतदानासाठी तरूण बाहेर पडताना दिसत नाही. अशा वेळी गडचिरोलीत 111 वर्षांच्या आजीने थेट मतदान केंद्रावर येवून मतदान केले आहे. तरूणांनी मतदानासाठी बाहेर पडावे असा आवाहन ही या वेळी आजींनी केले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

फुलमती बिनोद सरकार या आजींचे वय 111 वर्ष आहे. त्या मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर इथल्या रहिवाशी आहे. 85 वर्षापेक्षा जास्त वयाच्या वक्तींना घरातून मतदान करण्याची मुभा आहे. पण आजींचा उत्साह इतका आहे की त्यांनी घरातून मतदान करण्यास नकार दिला. त्यांन मतदान केंद्रावर जावूनच मतदान करायचे होते. मग काय आजीसाठी चाकचाकी मागवली गेली. त्यानंतर त्या थेट मतदान केंद्रावर पोहोचल्या. आजींना पाहून अनेकांना आश्चर्यही वाटले. व्हिल चेअरवर येत त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. 

ट्रेंडिंग बातमी - वाह रे पठ्ठ्या! मतदानासाठी थेट दुबईतून ठाण्यात आला, मतदानानंतर म्हणाला...

फुलमती सरकार या आजींचा जन्म 1 जानेवारी 1913 सालचा आहे. आजीला चालता येत नसल्याने प्रशासनाने त्यांच्यासाठी चारचाकी वाहन आणि व्हिल चेअरची व्यवस्था केली होती.आजीने प्रत्यक्ष मतदान करत मतदारांमध्ये उत्साह निर्माण केला. आजींच्या मतदानाचा उत्साह कौतुकास्पद असाच होता.  मतदानाकडे पाठ फिरविणाऱ्या तरुणांना यावेळी आजीने सल्ला दिला आहे. सर्वांनी बाहेर पडून मतदान करा. आपला मतदानाचा हक्क बजावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

ट्रेंडिंग बातमी - "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांच्या समर्थकला पोलिसांसमोर धमकी

राज्यात एकीकडे धिम्यागतीने मतदान होत आहे. अशा वेळी गडचिरोली सारख्या जिल्ह्यात दुपारी एक वाजेपर्यंत पन्नास टक्के पेक्षा जास्त मतदान झाल्याचे समोर आले होते. संध्याकाळपर्यंत हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. लोकसभेलाही सर्वाधिक मतदान हे गडचिरोली जिल्ह्यातच झाले होते. या मतदार संघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होत आहे. मतमोजणी ही 23 तारखेला होत आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com