जाहिरात
Story ProgressBack

राज यांना ठाकरे गटाने डिवचले, चौकातच थेट व्यंगचित्र लावले

Read Time: 2 min
राज यांना ठाकरे गटाने डिवचले, चौकातच थेट व्यंगचित्र लावले
कल्याण:

मनसे नेते राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिका झाली. मनसेच्या काही नेत्यांनी नाराजीही व्यक्त केली. तर काहींनी थेट पक्षाला जय महाराष्ट्र केला. त्यानंतर राज यांनीही आपण देशाच्या विकासासाठी मोदींना पाठींबा देत आहे असे स्पष्ट केले. आता शिवसेना ठाकरे गटाने हे निमित्त साधत राज यांचे एक व्यंगचित्र थेट कल्याण्याच्या चौकात लावले आहे. हे व्यंगचित्र सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्यंगचित्रातून ठाकरेंनी राज यांना डिवचवण्या प्रयत्न केला आहे. 

हेही वाचा - भाजप उमेदवाराने शरद पवारांचे पाय धरले, पवारांनी काय आशिर्वाद दिले?

  

त्या व्यंगचित्रात काय? 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान  मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलाय. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते बाळ हरदास यांनी राज ठाकरे यांचे व्यंगचित्र काढलेला उपरोधिक बॅनर चौकात लावलाय. या बॅनरवर राज ठाकरे यांचे कार्टून काढण्यात आले आहे. पायात पॅड एका हातात बॅट देण्यात आलीय. दुसऱ्या हातात ते बोटावर चेंडू फिरवून दाखवत आहेत. त्यावर लिहीले आहे. कमाल आहे. बिनशर्त सर्व करणार असं त्यावर लिहीलं आहे. त्याखाली फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे डोकावून पाहात आहेत. अशा पद्धतीचे हे व्यंगचित आहे. आयपीएल मध्ये जसा impact प्लेयर असतो ,तसाच हा बॅनर खाली उपरोधिकपणे इम्पॅक्ट प्लेयर असे लिहले आहे.  हा बॅनर शहरात चर्चेचा विषय ठरलाय.

हेही वाचा -  आंबेडकरांना धक्का! वंचितमध्ये फूट? 'या' जिल्ह्यात फटका बसणार?

मनसे काय प्रत्युत्तर देणार? 

ठाकरे गटाने एक प्रकारे राज यांना या माध्यमातून डिवचले आहे. बॅट हातात आहे. बॉलही आहे पण खेळू शकत नाहीत असेच काहीसे या माध्यमातून सुचवले गेले आहे. हा सर्व खेळ फडणवीस शिंदे पवार मजे घेऊन पाहात आहेत. कल्याण हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांचा मतदार संघ आहे. या मतदार संघात मनसेचीही थोडी ताकद आहे. अशा वेळी राज यांच्यावर ठाकरे गटाकडून कार्टुनच्या माध्यमातून केलेली टिका जिव्हारी लागली असणार. त्यामुळे ते आता याला कशा पद्धतीने उत्तर देतात ते पहावे लागणार आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination