
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुली हिने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रुपाली गांगुलीने विनोद तावडे आणि अनिल बलूनी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र रुपाली गांगुली लोकसभा निवडणूक लढवणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. भाजप पक्षप्रवेशानंतर रुपाली गांगूलीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. जेपी नड्डा यांनी रुपाली गांगुलीचं स्वागत आणि अभिनंदन केलं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राजकीय प्रवेशासाठी भाजप पक्षच का निवडलं याबाबत बोलताना रुपालीने म्हटलं की, अभिनयाच्या माध्यमातून मी तुम्हाला भेटतच असते. देशातील विकास मी पाहत आहे. देशातील प्रगतीचा प्रवास पाहून मला वाटतं की मी पण या प्रवासाचा भाग का होऊ नये. त्यामुळे मी येथे आली आहे, जेणेकरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवलेल्या रस्त्यावर चालू शकेन. देशसेवा करु शकेन. मला तुमचा आशीर्वाद हवाय. जे करुन ते चांगलं करेन आणि योग्य करेन.
नक्की वाचा- मुख्यमंत्री म्हणून कोणता निर्णय घ्यायला आवडेल? श्रीकांत शिंदेंचे भन्नाट उत्तर
#WATCH | Actress Rupali Ganguly joins BJP at the party headquarters in Delhi
— ANI (@ANI) May 1, 2024
She says, "...When I see this 'Mahayagya' of development, I feel that I should also take part in this...I need your blessings and support so that whatever I do, I do it right and good...'' pic.twitter.com/x7pT7oq0xB
(नक्की वाचा : "आमचं सरकार आल्याने अडीच वर्षांची नकारात्मकता गेली"; 'NDTV मराठी'वर CM एकनाथ शिंदेंची खास मुलाखत)
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मी फॅन
रुपाली गांगुलीने पुढे म्हटलं की, मला येथे येऊन खूप सन्मानित वाटत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाने मी खूप प्रभावित झाले आहे. मी त्यांची खूप मोठी फॅन आहे. भाजप मोठ्या प्रमाणात विकासकामे करत आहे, या कामामुळे मी प्रभावित आहे. म्हणूनच मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे. रुपाली गांगुलीच्या भाजप प्रवेशानंतर अनेकजण रुपालीला निवडणूक लढवण्याचा सल्ला देत आहेत. लोकांनी म्हटलं की, रुपालीने निवडणूक लढवली तर ती जिंकू शकते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world