जाहिरात

'उद्धव ठाकरेला संपवलात मग आता का घाबरता' ठाकरेंनी मोदी-शाहंना डिवचले

पंतप्रधान हे देशाचे असतात. ते कोणत्या पक्षाचे नसतात. तसेच गृहमंत्री हे देशाचे असतात. पण हे दोघेही प्रचार करत सुटले आहेत.

'उद्धव ठाकरेला संपवलात मग आता का घाबरता' ठाकरेंनी मोदी-शाहंना डिवचले
सांगली:

उद्धव ठाकरे यांनी लातूर जिल्ह्यातील औसा मतदार संघात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष केलं. पंतप्रधान हे देशाचे असतात. ते कोणत्या पक्षाचे नसतात. तसेच गृहमंत्री हे देशाचे असतात. पण हे दोघेही प्रचार करत सुटले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेला संपवलं. जर तुम्ही उद्धव ठाकरेंना संपवलं असाल तर मग ऐवढे का घाबरता असा प्रश्नच उद्धव यांनी या सभेत केला. शिवाय या दोघांनीही आपल्या पदाचा राजीनामा देवून पूर्व वेळ प्रचारक म्हणून काम करावे असेही ते म्हणाले. माझ्या बॅग चेक केल्या जात आहेत. मग मोदी आणि शाह यांच्याही बॅग चेक करा असे उद्धव यावेळी म्हणाले. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महाराष्ट्र लुटण्यासाठी भाजपने आपलं सरकार पाडल असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. भाजप हा भाकड जनता पक्ष आहे. हा भेकडांचा पक्ष आहे. त्यांच्या बरोबर चोर दरोडेखोर आहे. अशी यांची ही महायुती आहे. अशा या महायुतीला मत म्हणजे गुजरातला मत असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. आपण मुख्यमंत्री असताना त्यांना महाराष्ट्र लुटू दिला नाही. त्यामुळेच आपण आजारी असताना आपलं सरकार पाडलं गेलं असंही ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस त्यावेळी मी पुन्हा येईन असं सांगत होते. ते आले पण आधी फुल होते नंतर हाफ बनून आले असा टोलाही ठाकरे यांनी यावेळी लगावला. 

ट्रेंडिंग बातमी - '...तर बाळा साहेबांनी उद्धव ठाकरेंचा हात मोडला असता' राणेंनंतर कदम हे काय बोलले?

2019  साली आपल्याला अमित शाह यांनी वचन दिलं होतं. ते वचन त्यांनी तोडलं.  काही दिवसा पूर्वी अमित शाह म्हणाले की देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार. तसं होणार असेल तर मिंधे त्यांची भांडी घासणार. आणि त्यासाठी लागणारी माती अजित पवार देणार असा हल्लाबोल त्यांनी केला. त्यांनी गद्दार चोरले आहेत. पण ते माझी जीवाभावाची माणसं चोरू शकत नाहीत. त्यांचे प्रेम आहे म्हणून ते आजही आपल्या मागे ठाम पणे उभे आहेत असं ठाकरे यावेळी म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - 'गावात येऊन रोज तुमचे मुके घ्यायचे काय?' भाजप उमेदवार असं का बोलले?

गेली दोन दिवस उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासल्या जात आहेत. या बॅग तपासण्यावर आपला आक्षेप नाही. पण जशी आपली बॅग तपासली जात आहे तशी मोदी आणि शाह यांची ही बॅग तपासा. त्यांची बॅग येताना न तपासता जाताना तपासा. कारण ते इथून सर्व लुटून नेत आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. कायदा सर्वांसाठी समान आहे. मोदी आणि शाहंसाठी वेगळा असू शकत नाही असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान मोदी शाह यांच्या  थापांना महाराष्ट्र कंटाळला आहे. यांनी पंधरा लाख देणार असं सांगितलं होतं. शिवाय हमी भाव देणार असंही सांगितलं होतं. आता तर घोषणांचा पाऊस पडत आहे. पण प्रत्यक्षात दुष्काळ आहे असा टोलाही त्यांनी लगावला.    

ट्रेंडिंग बातमी - 'उद्धव ठाकरे बिनकामाचा माणूस, अडीच वर्षात...' शहाजीबापूंनी नक्कल करत सुनावलं

आनंदाचा शिधा ज्यांना मिळाला नाही ते खरोखर नशिबवान आहेत. जो आनंदाचा शिधा वाटला गेला त्यात उंदराच्या लेंढ्या, झुरळ, आळ्या असल्याचे आढळले. हाच का तुमचा 'आनंद' असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला. सध्या कापूस उत्पादक शेतकरी नाराजा आहे. तीच स्थिती सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचीही आहे. पण त्याच्यासाठी हे सरकार काही करत नाही. अडीच वर्षात यांनी महाराष्ट्र लुटला आहे. त्यामुळे ही लढाई तुमच्या आयुष्याची आहे. निष्ठावंताच्या हाती महाराष्ट्र द्यायचा की लुटारूंच्या असा प्रश्न त्यांनी यावेळी केली. शिवाय महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन ही केले. 
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com