जाहिरात

'रामदास कदम यांना मनोरुग्णालयात ठेवा', भाजपाचीच मागणी! कोकणात खळबळ

राज्यात विधानसभा निवडणुकीचा टप्पा अंतिम टप्प्यात आलाय. त्याचवेळी रत्नागिरी जिल्ह्यात भाजपा आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) या मित्रपक्षांमध्ये जुंपली आहे.

'रामदास कदम यांना मनोरुग्णालयात ठेवा', भाजपाचीच मागणी! कोकणात खळबळ
रत्नागिरी:

राकेश गुडेकर, प्रतिनिधी 

राज्यात विधानसभा निवडणुकीचा टप्पा अंतिम टप्प्यात आलाय. त्याचवेळी रत्नागिरी जिल्ह्यात भाजपा आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) या मित्रपक्षांमध्ये जुंपली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांना नजर कैदेत किंवा मनोरुग्णालयात ठेवा, अशी मागणी भाजपा कार्यकर्त्यांनी केल्यानं एकच खळबळ उडाली आहेे. रामदास कदम यांच्या चुकीच्या वक्तव्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी गुहागर आणि दापोलीमध्ये शिवसेना उमेदवाराचा प्रचार थांबवला.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

गुहागरमध्ये राजेश बेंदल तर दापोलीमध्ये रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम शिवसेनेचे उमेदवार आहेत. रामदास कदम यांनी तात्काळ डॉक्टर विनय नातू आणि भाजपची माफी मागावी अन्यथा आम्ही आमचा निर्णय घेऊ, असा इशाराही भाजपा कार्यकर्त्यांनी दिला आहे. 

विनय नातू हे आमच्यासाठी सर्वोच्च, त्यामुळे आमच्या नेत्यावरती कोणीही काही बोललेलं आम्ही सहन करणार नाही. रामदास कदम आणि भास्कर जाधव यांचे मिलीभगत असल्याचा आरोपही भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आलाय. 

Exclusive : 'हे लहान मुलांचं रडगाणं,' उद्धव ठाकरेंच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांनी दिलं पहिल्यांदाच उत्तर

( नक्की वाचा : Exclusive : 'हे लहान मुलांचं रडगाणं,' उद्धव ठाकरेंच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांनी दिलं पहिल्यांदाच उत्तर )

शिवसेनेच्या नेत्यांनी रामदास कदम यांना नजर कैदेत ठेवावे किंवा मनोरुग्णालयात ठेवावे, अशी मागणी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केलीय.  निवडणुकीनंतर निकाल वेगळे आल्यास भाजपाला जबाबदार धरू नये, असंही भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेत्यांना स्पष्ट संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विपुल कदम भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यासाठी गुहागर मध्ये दाखल झाले आहेत. या विषयावर झालेल्या बैठकीत  माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांच्यासह जिल्हाध्यक्ष केदार साठे आणि तीनही तालुक्याचे तालुकाध्यक्ष बैठकीत उपस्थित होते

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: