जाहिरात
Story ProgressBack

कॅप्टन कूल, टप्प्यात आला की विनिंग शॉट! राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर लागलेल्या पोस्टरची चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यालयाबाहेर लागेल्या एका पोस्टरची जोरदार चर्चा सुरू आहे.

Read Time: 2 mins
कॅप्टन कूल, टप्प्यात आला की विनिंग शॉट! राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर लागलेल्या पोस्टरची चर्चा
मुंबई:

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला काही क्षणातच सुरूवात होणार आहे. त्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यालयाबाहेर लागेल्या एका पोस्टरची जोरदार चर्चा सुरू आहे. या पोस्टरवर वझिर असा उल्लेख करत टिम राष्ट्रवादीचे कॅप्टन कुल असा उल्लेख केला आहे. शिवाय टप्प्यात आला की विनिंग शॉट असाही उल्लेख या पोस्टरवर आहे. त्यात दहा पैकी सात जागा जिंकणार असेही म्हटले आहे. जयंत पाटील साहेब असे लिहीत हॅशटॅग बॉस असा उल्लेख त्यावर आहे. निकाला आधी लागेलेल्या या पोस्टरची चर्चा जोरदार होत आहे. 

हेही वाचा - LIVE Election Results 2024: भाजपने खाते उघडले, सुरतमधील जागा जिंकली

लोकसभेच्या दहा जागा राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीत लढवल्या होत्या. त्या पैकी सात जागा जिंकण्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसला आहे. या आत्मविश्वासामुळेच असा पद्धतीते बॅनर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालया बाहेर झळकले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर होत असलेली ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे दोन्ही गटामध्ये कार्यकर्ते आणि मतदार नेमके कोणाच्या बाजूने आहेत हे या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. 

हेही वाचा - महाराष्ट्राची गॅरेंटी कुणाला? वाचा तुमच्या मतदारसंघातील संपूर्ण विश्लेषण

शरद पवार गटाने लोकसभेच्या दहा जागा लढवल्या होत्या. या दहाही जागांवर शरद पवारांनी मोठी ताकद लावली होती. उमेदवारांनाही शक्ती दिली होती. राज्यातल्या महाविकास आघाडी तीस ते पस्तीस जागा जिंकेल असा विश्वासही पवारांनी व्यक्त केला होता. शिवाय राष्ट्रवादीचाही त्यातला वाटा मोठा असेल असेही ते म्हणाले होते. पक्ष फुटीनंतर पवारांनी कोणताही ताण घेतला नाही. उलट नव्याने पक्ष बांधणी केली. नव्या चेहऱ्यांना संधी दिली. यांच्याच आधारावर ते या निवडणुकीला सामोरे गेले. नव्या टिमच्या जोरावर यश मिळेल असा विश्वास त्यांना आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अशा आशयाचे बॅनर लावलेले आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
Lok Sabha Elections 2024 Result : मतमोजणी सुरु होण्यापूर्वीच भाजपाला 1 जागा, 'हे' कसं घडलं?
कॅप्टन कूल, टप्प्यात आला की विनिंग शॉट! राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर लागलेल्या पोस्टरची चर्चा
Maha Vikas Aghadi and Maha Uyoti are fighting fiercely on 48 seats in Maharashtra
Next Article
महाराष्ट्रात काँटे की टक्कर! सुरूवातीच्या कलांमध्ये कोण पुढे कोण मागे?
;