नाशिक लोकसभा मतदार संघ हा निवडणूक जाहीर होण्यापासून ते अगदी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत वेगवेगळ्या कारणाने चर्चेत राहीला आहे. सुरूवातीला हा मतदार संघ कोणाच्या वाट्याला जाणार यावरून महायुतीत घोळ सुरू होता. तो नुकताच संपला. तर उमेदवारी न मिळाल्यामुळे शिवसेना ठाकरे गटातील एक नेता नाराजही झाला. तर शिवसेना आणि भाजपने उमेदवारी दिली नाही म्हणून शांतिगीरी महाराजही अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले. इथपर्यंतच हे थांबलं नाही तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ठाकरे गटाला एक धक्का बसला आहे. पक्षाचे नेते विजय करंजकर यांनी आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अखेर विजय करंजकर अपक्ष म्हणून मैदानात
विजय करंजकर यांना एक वर्षापूर्वी लोकसभेची तयारी करा असा संदेश देण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे. एक वर्षभर तयारी करूनही उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज होते. दोन दिवसापूर्वी गिरीश महाजन यांची करंजकर यांनी भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी लोकसभेसाठी आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज आज ( शुक्रवार ) दाखल केला. करंजकर यांची बंडखोरी ही उद्धव ठाकरे गटाची डोकेदुखी वाढणारी ठरण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - 'तो' पॉर्नस्टार नाही तर... तो कलाकार आला समोर, चित्रा वाघांच्या अडचणी वाढणार?
35 नगरसेवक सोबत असल्याचा दावा
करंजकर यांनी आपल्या सोबत 35 नगरसेवक असल्याचा दावा केला आहे. शिवाय 4 जिल्हा परिषद सदस्यही आपल्या बरोबर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या सर्वांसह कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान पक्षाला स्वत; ची प्रॉपर्टी असल्या सारखे काही जण समजत आहेत. अशा पाताळधुंडीना पाताळात पोहोचवल्या शिवाय राहाणार नाही असेही करंजकर यांनी सांगितले आहे. हे उद्धव ठाकरे यांनाही माहिती आहे. त्यांच्यावर उद्धव ठाकरे कारवाई नक्की करतील त्याची आपण वाट पाहात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - 'सांगलीच्या वाघा'वरुन मविआमध्ये डरकाळ्या, राऊत-कदमांमध्ये काय घडलं?
नाशिक लोकसभेत तिरंगी लढत
शिवसेना ठाकरे गटाने नाशिकमधून राजाभाऊ वाझे यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेना शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. तर शांतिगीरी महाराज हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्यात आता विजय करंजकर यांची भर पडली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world