विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लातूरमध्ये भाजपला काँग्रेसने मोठा धक्का दिला आहे. भाजपचे माजी खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी भाजपची साथ सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी त्यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर जोरदार हल्लाबोल करत गंभीर आरोप केले आहेत. लोकसभा निवडणुकीत आपला प्रचार भाजपच्या कोणत्याच नेत्याने केला नाही. माझा पराभव हा भाजपच्या स्थानिक नेत्यांनीच केला, असा आरोप करत आता एकालाही सोडणार नाही असा थेट इशारा या निमित्ताने सुधाकर श्रृंगारे यांनी दिला. लातूर येथे जाहीर सभेत ते बोलत होते. त्यावेळी काँग्रेस उमेदवार अमित देशमुख व्यासपिठावर उपस्थित होते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुधाकर शृंगारे यांना भाजपने उमेदवारी दिली होती. श्रृंगारे हे खासदारही राहीले आहेत. या निवडणुकीत मात्र त्यांना पराभव स्विकारावा लागला. त्यानंतर विधानसभेच्या तोंडावर त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसच्या मंचावरून बोलताना त्यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपचे आमदार आणि स्थानिक नेते मला कोणत्याही तालुक्यात फिरू देत नव्हते. माझावर अनेक बंधने होती, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. शिवाय लोकसभेला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आपला प्रचारच केला नाही असा आरोपही त्यांनी केला आहे.
ट्रेंडिंग बातमी - 'आबांचे केस खूप लहान होते, त्यामुळे ते केसाने गळा कापू शकत नाहीत' संजय राऊत
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा वेळी कोणी आजारपणाचे सोंग घेतले, तर कोणी रात्रभर नुसत्या बैठका घेतल्या, माझा प्रचार कोणीही केला नाही. माझा पराभव भाजपच्याच स्थानिक नेत्यांनी केला असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. मला पाडलं आता एकालाही सोडणार नाही असा इशाराच शृंगारे यांनी यावेळी दिला. पाच वर्ष आपला स्थानिक नेत्यांनी छळ केला. मानसिक त्रास दिला. खासदार असूनही मतदार संघात फिरू दिले नाही असा आरोपही त्यांनी यावेळी केला. आपल्या विरोधात भाजपच्याच लोकांनी कटकारस्थान रचलं असंही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - मुनगंटीवारांचा खंदा कार्यकर्ता ढसाढसा रडला, कारण काय?
मला लोकसभेची उमेदवारी कोणी दिली हेच मला माहित नाही. पक्षाने उमेदवारी दिली म्हणून आपण निवडणुकीला उभे राहीलो असेही ते म्हणाले. मात्र पडद्यामागे षडयंत्र रचलं गेले. भाजपच्या नेत्यांनी पाच टक्केही प्रचार केला नाही. उलट आपल्याला मानसिक त्रास दिला. पण ज्या गोष्टी होतात त्या चांगल्यासाठी होतात. माला पाडलं ते एका अर्थाने चांगलचं झाले. मला पाडून तुम्ही मला काँग्रेसमध्ये येण्याची या निमित्ताने तरी संधी दिली, असे सांगत त्यांनी अमित देशमुख यांचे आभारही मानले.
ट्रेंडिंग बातमी - Assembly Election : महाराष्ट्र विधानसभेत दोन आघाड्या, सहा पक्ष अन् बंडखोरीला उधाण
मात्र ज्यांनी आपला लोकसभेला घात केला त्यातल्या प्रत्येकाचा हिशोब केल्या शिवाय राहाणार नाही. त्या प्रत्येकाला आता सोडणार नाही असेही त्यांनी सांगितले. लातूर लोकसभा मतदार संघातून भाजपकडून सुधाकर श्रृंगारे यांनी निवडणूक लढवली होती. त्यांचा काँग्रेसच्या शिवाजीराव काळजे यांनी जवळपास साठ हजाराच्या फरकाने पराभव केला होता. आपले मुळ हे काँग्रेसचे असल्याचे सांगत आता सुधाकर श्रृंगारे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे विधानसभेला काँग्रेसला बळ मिळणार हे निश्चित आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world