जाहिरात

विदेशी मानसिकतेच्या काँग्रेसकडून नेहमीच महाराष्ट्राचा द्वेष, पुण्यातील सभेत PM मोदींचा प्रहार

जी कामं पूर्वी व्हायला हवी होती, ती महायुती सरकारच्या राजवटीत होत आहेत. ती काम विदेशी मानसिकतेच्या काँग्रेसनं महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल असलेल्या द्वेषातून केली नाहीत, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

विदेशी मानसिकतेच्या काँग्रेसकडून नेहमीच महाराष्ट्राचा द्वेष, पुण्यातील सभेत PM मोदींचा प्रहार
पुणे:

मराठी भाषेला अभिजात भाषेजा दर्जा देण्यासह महाराष्ट्रातील अनेक कामं जी पूर्वी व्हायला हवी होती, ती महायुती सरकारच्या राजवटीत होत आहेत. ती काम विदेशी मानसिकतेच्या काँग्रेसनं महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल असलेल्या द्वेषातून केली नाहीत, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. पंतप्रधानांची आज (मंगळवार, 12 नोव्हेंबर) रोजी सभा झाली. त्या सभेत ते बोलत होते. 

काँग्रेसला महाराष्ट्राचा द्वेष

जी काम खूप पूर्वी व्हायला हवी होती, ती काम विदेशी मानसिकतेच्या काँग्रेसनं महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल असलेल्या द्वेषातून केली नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात  काँग्रेस आणि सहकारी औरंगजेबाची स्तुतीकवने गातात. मी महाविकास आघाडीच्या नेत्यांना आव्हान देतो. तुमच्यात दम असेल तर तुमच्या युवराजाच्या तोंडातून सावरकारांचं गौरव करणारं भाषण करायला सांगा. तुमच्यात दम असेल तर तुमच्या युवराजाच्या तोंडातून बाळासाहेब ठाकरेंची प्रशंसा महाराष्ट्राला ऐकवा, असं आव्हान मोदींनी महाविकास आघाडीला या सभेत दिलं.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पुण्यासाठी आगामी पाच वर्ष महत्त्वाची 

पुणे आणि भाजपाचं नातं विचार, संस्कार आणि आस्थेचं नातं आहे. पुण्यानं नेहमी भाजपाचा विचार आणि व्हिजनला पाठिंबा दिला आहे. त्यासाठी पुण्याचा आभारी आहे. महायुतीचं नवं सरकार पुणे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठं काम करेल. आगामी पाच वर्ष पुण्याच्या विकासाची नवी भरारी घेणारी वर्ष असतील. 

पुण्यातील लोकांना सशक्त करण्यासाठी गुंतवणूक, पायाभूत सुविधा आणि उद्योग या तीन गोष्टींची गरज आहे. आम्ही या तीन्ही विषयावर काम केलं आहे. गेल्या दहा वर्षात परकीय गुंतवणुकीत मोठी वाढ झाली आहे. गेल्या अडीच वर्षात भारतामध्ये येणाऱ्या विदेशी कपंन्यांच्या प्राधान्यामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक वरचा आहे. पुणे आणि परिसराला याचा फायदा होतं आहे, असा दावा मोदींनी केला. 

'PM मोदींना नोबेल शांतता पुरस्कार द्या', दिग्गज गुंतवणूकतज्ज्ञांनी केली मागणी

( नक्की वाचा : 'PM मोदींना नोबेल शांतता पुरस्कार द्या', दिग्गज गुंतवणूकतज्ज्ञांनी केली मागणी )

पुण्याच्या कनेक्टीव्हीटीसाठी महायुतीचं सरकार गांभीर्यानं काम करत आहे. तुमच्या आकांक्षा माझ्यासाठी तुमचा आदेश आहे. तुमची स्वप्न माझ्यासाठी दिवस-रात्र काम करण्याची प्रेरणा आहे. तुमच्या गरजा माझ्या सरकारच्या योजनांचा आधार आहे. तुमचं आयुष्य सुसह्य व्हावं ही माझी, महायुतीची प्राथमिकता आहे. त्यामुळे पुण्यात मेट्रो रेल्वेचा सातत्यानं विकास होत आहे. इंट्रासिटी आणि इंटरसिटी या दोन्ही नेटवर्कवर काम होत आहे. पुण्यातील पूर्व-पश्चिम आऊटररिंग रोडवरही काम सुरु आहे, असं त्यांनी सांगितला. पुण्याला 21 व्या शतकातील वेल कनेक्टेड शहर करण्यासाठी पुढं जात आहे, असं त्यांनी सांगितलं.

जगदगुरु तुकाराम महाराज पालखी मार्ग आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग त्याचं काम सुरु आहे. आमच्या वारकऱ्यांसाठी ही समर्पित सेवा आहे. महाराष्ट्रात विकासाची गती अभूतपूर्व आहे. पण, महायुतीपूर्वी जे लोकं सरकार चालवत होते. त्यांच्याकडं तुम्हाला सांगायला एकही काम नाही. त्यांचा अडीच वर्षांचा वेळ आमच्या कामांना स्थगिती देण्यात गेले, अशी टीका मोदींनी केली. 

'.... तर हिंदूंच्या जमिनी घेतल्या जातील', योगी आदित्यनाथ यांचा थेट इशारा

( नक्की वाचा : '.... तर हिंदूंच्या जमिनी घेतल्या जातील', योगी आदित्यनाथ यांचा थेट इशारा )

काँग्रेसचं संकट दूर ठेवा

भाजपा महायुती आहे, तरच महाराष्ट्राला गती आहे. तुम्हाला महाराष्ट्र वाचावायचा असेल तर काँग्रेस हे संकट दूर ठेवा. संपूर्ण देश यंदा काँग्रेसचा विश्वासघात पाहात आहे. काँग्रेसनं जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव पास केला आहे. संविधानाची पुस्तकं दाखवणारी आणि महाराष्ट्रात कोरा कागद वाटणाऱ्या लोकांना मला विचारायचं आहे, बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेलं संविधान संपूर्ण देशात का लागू झालं नाही? सहा-सात दशक बाबासाहेबांचं संविधान लागू नव्हतं.

तुम्ही मोदींना सेवेची संधी दिली तेव्हाच बाबासाहेबांचं संविधान जम्मू काश्मीरमध्य्े पोहोचले. तुमच्या आशीर्वादामुळे तुमचा सेवक मोदींनी 370 कलम जमिनीत गाडलंय.  असं मोदींनी सांगितलं. काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पुन्हा हे कलम लागू करण्यासाठी विधानसभेत प्रस्ताव पास करत आहे. काश्मीरमध्ये 370 कलम लागू करण्याची भाषा गेल्या 70 वर्षात फक्त पाकिस्तान करत होतं. आज ती भाषा आज काँग्रेस आणि त्याचे साथीदार बोलत आहेत, असा आरोप मोदींनी केला. 

काँग्रेस फुट पाडण्याचं काम करत आहे, पण 'आपण एकत्र राहू तरच सुरक्षित राहू' असं पंतप्रधानांनी यावेळी पुन्हा एकदा सांगितलं. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com