स्वानंद पाटील
विधानसभा निवडणूक लढायची नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केली आहे. त्यानंतर अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. आता मनोज जरांगे पाटील हे प्रत्यक्षात मैदानात उतरले आहे. त्यांचा बीड जिल्ह्याचा दौरा सुरू झाला आहे. त्याची सुरूवात त्यांनी गेवराई तालुक्यातील त्वरिता देवीचे दर्शन घेऊन केले आहे. या दौऱ्यात त्यांनी आपली पुढील भूमिका स्पष्ट करताना आता, पाडापाडी असे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या पाडापाडीचा फटका कोणाला बसणार याची चर्चा मराठवाड्यात सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीला जरांगे फॅक्टर मराठवाड्यात चांगलाच दिसून आला होता. आता विधानसभेत तो किती परिणामकार पणे दिसून येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विधानसभा निवडणुकीसाठी मराठा समाजाकडून अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र त्यातल्या अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेले नाही. त्यांना जरांगे यांनी खडे बोल सुनावले आहे. अशा उमेदवारांनी पचका करून ठेवला आहे असे जरांगे पाटील यावेळी म्हणाले. ज्यांनी अर्ज भरले त्यांना सांगितले होते, अपक्ष अर्ज भरून मते खायचे काम करू नका. त्यामुळे ज्यांना पाडायचे आहे, ते पडणार नाहीत. समाजाला सांगितले आहे. माझा पाठिंबा अपक्षाला आणि कुणालाच नाही. ही बाबत जरांगे यांनी स्पष्ट केली आहे.
ट्रेंडिंग बातमी - मधूरिमा राजेंनी उमेदवारी मागे का घेतली? सतेज पाटील पहिल्यांदा बोलले, पण थेट बोलले
पुढे बोलताना जरांगे यांनी मला समाजाचे भविष्य बघायचं आहे. मूर्ख होऊन चालणार नाही. दीडशे जणांना उभे केले असते. मात्र त्यांच्यासाठी सहा कोटी समाजाचे वाटोळे करू शकत नाही. तो क्षणिक आनंद आहे. मला समाजाला आरक्षण देऊन आयुष्यभराचा आनंद द्यायचा आहे. मी मूर्खासारखे चाळे नाही करू शकत. मागे सरकलो म्हणून काय वाईट झाले. मी मराठा समाजाचे काम करतो. दीडशे जणांचे काम करत नाही. त्यांच्यासाठी करोडो मराठ्यांना अडचणीत आणणार नाही. ते जर पडले असते तर समाजाला हिणले गेले असते. टोमणे मिळाले असते. त्यामुळे माझ्या समाजाची मान खाली जाईल म्हणून मी माघार घेतली असे स्पष्टीकरण जरांगे यांनी दिले. समाजासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे. या राजकारणासाठी आरक्षण जायला नको म्हणून मी ही भूमिका घेतली असेही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - लाल संविधान दाखवून कुणाला इशारा देताय? देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधींना प्रश्न
आज पासून पुन्हा एकदा आरक्षणाचा लढा सुरू झाला आहे. आम्हाला कुणाच्याही प्रचाराला जायची गरज नाही. आता पुन्हा लढा उभा करायचा आणि आरक्षण मिळवायचं आहे. राजकारणासाठी असतो तर उमेदवार उभे केले असते. माझा समाज माझ्यासाठी मोठा आहे. या समाजाला मी मायबाप मानलं आहे. समाज अडचणीत येऊ नये म्हणून मी योग्य पाऊल उचलत आहे. कुणाच्याही प्रचाराला आणि सभेलाही जाऊ नका. माझा निरोप आला तर बघू आणि नाही आला तर तुमच्या हिताचा निवडून येईल तिकडेच मतदान करायचं. पण शक्यतो पाडापाडी कराचं असे स्पष्ट आदेश जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला दिले आहे.
ट्रेंडिंग बातमी - जरांगे यांनी उमेदवार का दिले नाहीत? आदल्या रात्री पडद्यामागे काय घडलं?
शक्यतो पाडापाडी करायची हे स्पष्ट आदेश जरांगे पाटील यांनी आता दिले आहेत. त्यामुळे समाजाने कोणाला पाडायचे याचीही चर्चा सुरू झाली आहे. भाजपला जरांगे यांनी जाहीर पणे या आधीही विरोध केला होता. त्याचा फटका लोकसभेला भाजपला बसला. त्याची झळ भाजपला मराठवाड्यात दिसून आली. आता विधानसभेतही जरांगे यांनी पाडापाडीचे आदेश दिले आहेत. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात मराठा समाज आहे. शिवाय तो निर्णायक मतदारही आहे. त्यामुळे मराठे कोणाला मतदान करणार आणि कोणाला पाडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण जरांगेंच्या या निर्णयामुळे भाजपच्या उमेदवारांच्या पोटात मात्र गोळा आल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world