मुंबई हे स्वप्नांचे शहर आहे. पण स्वप्न पुर्ण करणारी युती म्हणजे महायुती आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. शिवाजी पार्क येथे महायुतीची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. आघाडी ध्रुविकरणाचे राजकारण करत आहेत. त्याचे ते गुलाम झाले आहेत. मात्र संपुर्ण महाराष्ट्रात प्रचारासाठी मी फिरलो आहे. लोकां बरोबर संवाद साधला आहे. त्यात महायुतीचे सरकार येताना स्पष्ट पणे दिसत आहे असे मोदी यावेळी म्हणाले.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरूवात मराठीतून केली. मुंबईकर बंधु आणि बहीणीनो, माझा तुम्हाला नमस्कार, राम राम, जय श्रीराम असं ते म्हणाले. शिवाय सिद्धिविनायक, मुंबादेवी, महालक्ष्मीच्या पाया पडतो असं म्हणत त्यांनी भाषणाला सुरूवात केली. महाराष्ट्रातली ही माझी शेवटची सभा आहे. प्रचारासाठी मी संपुर्ण महाराष्ट्रात फिरलो आहे. यावेळी प्रत्येक भागातल्या लोकांशी संवाद साधला आहे. आता मी आमच्या मुंबईत आहे. पुर्ण महाराष्ट्राचा आशिर्वाद महायुती बरोबर आहे. प्रत्येक ठिकाणी एकच आवाज आहे भाजपा महायुती आहे तर गती आहे. महाराष्ट्राची प्रगती आहे. असं ते यावेळी म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - 'उद्धवजी तुम्हाला बाळासाहेबांनी हेच शिकवलं का?' आठवलेंचा ठाकरेंना सवाल काय?
महाराष्ट्रातून नव्या नव्या गोष्टी प्रत्येक वेळी समोर आल्या आहेत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत ज्ञानदेव, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वांना प्रेरणा दिली आहे. टिळक -आगरकरांसारखे समाज सुधारक याच भूमितून आले आहे. त्यांची विचारधार हिच आमची विचार धारा आहे असे मोदी यावेळी म्हणाले. त्यांच्या विचारांवर महायुतीला गर्व आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या गौरवाचा अपमान करत असताना दिसत आहे असा आरोपही त्यांनी केला. आघाडी ध्रुविकरणाचे राजकारण करत आहे. याच आघाडीच्या लोकांनी राम मंदीराला विरोध केला. मतांसाठी यांनी भगवा आतंकवाद हा शब्द आणला. आघाडीने सावरकरांचा अपमान केला. कश्मीरमधील 370 कलम परत लागू करण्याचा प्रस्तावही आणला आहे. त्यांचा काश्मीरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान काश्मीरमध्ये लागू करण्यास विरोध आहे असा हल्लाबोलही यावेळी केला.
राजकारणात वार पलटवार होत असतात. ते आपण समजू शकतो. पण देशाची पेक्षा कोणताही पक्ष मोठा नसतो. पण काही हे आघाडीचे लोक देशा पेक्षा पक्षाला मोठं समजत आहेत. भारत प्रगती करत आहे. त्यामुळे या आघाडीच्या लोकांना त्रास होत आहे. ते नेहमी अनेक प्रश्न उपस्थित करत असतात. याच लोकांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळू दिला नाही. आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यानंतर यांच्या पोटात दुखू लागले असंही ते म्हणाले. त्यामुळे या आघाडी पासून सावध रहा असा सल्लाही मोदींनी यावेळी दिला.
ट्रेंडिंग बातमी - 'आयुष्यात कधी संविधान वाचलं नाही', राहुल गांधींचा PM मोदींना टोला
या वेळी बोलताना त्यांनी मुंबई हे स्वप्नाचं शहर आहे. तर युती स्वप्न साकार करणारी महायुती आहे असं मोदी म्हणाले. मुंबईत गरीब, मध्यम वर्ग, आणि सामान्य माणूस आहे. ते एक काळ होता की स्वप्न ही बघू शकत नव्हते. पण आता ते स्वप्नही पाहात आहेत. आणि ती स्वप्नही पुर्ण करत आहेत. तुमच्या स्वप्नांसाठीच मी जगत आहे. ती पुर्ण व्हावीत यासाठी मी झटत आहेत असं मोदी यावेळी म्हणाले. या पुढेही जनतेसाठी आपण काम करत राहाणार असल्याचे ते म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world