जाहिरात

राहुल गांधींना 'त्या' बैठकीत राग का आला? नाना पटोलेंनी सांगितली आतली बातमी

काँग्रेस नेत्याच्या बैठकीतून नाराज होवून राहुल गांधी बैठक सोडून गेले. त्यावेळी नक्की काय झालं याचा ही उलगडा पटोले यांनी केला.

राहुल गांधींना 'त्या' बैठकीत राग का आला? नाना पटोलेंनी सांगितली आतली बातमी
मुंबई:

जागा वाटपाचा पेच ते संजय राऊत यांच्या बरोबर झालेला वाद या सर्व गोष्टीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रकाश टाकला. शिवाय काँग्रेस नेत्याच्या बैठकीतून नाराज होवून राहुल गांधी बैठक सोडून गेले. त्यावेळी नक्की काय झालं याचा ही उलगडा पटोले यांनी केला. NDTV मराठीनं 'महाराष्ट्राचा जाहीरनामा' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात बोलताना नाना पटोले यांना याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीत मविआ आणि काँग्रेसची काय रणनिती असेल यावरही भाष्य केले आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जागा वाटपात काँग्रेसने आक्रमक भूमीका घेतली नाही. शिवाय हक्काच्या जागा मित्र पक्षांना सोडल्या. त्यामुळे राहुल गांधी नाराज झाले होते. त्यानंतर ते बैठक सोडून निघून गेले अशा बातम्या समोर आल्या होत्या. त्यावर नाना पटोले यांनी त्या बैठकीत काय झाले हे सांगितले आहे. सर्व जाती धर्माच्या नेत्यांना उमेदवारी मिळावी यासाठी राहुल गांधी यांचा आग्रह होता. ज्या जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या त्या ठिकाणी काहींना संधी दिली. सर्वच जाती धर्मांना संधी देणे शक्य नव्हते. त्याची खंत राहुल गांधी यांनी बोलून दाखवली. 

ट्रेंडिंग बातमी - NDTV Conclave:'आम्ही ठाकरेंच्या डिझाईनला बळी पडलो' प्रकाश आंबेडकर थेट बोलले

ही खंत राज्यातल्या काँग्रेसच्या सर्वच नेत्यांना होती. याबैठकीत प्रत्येक जागेवर चर्चा झाली. ही चर्चा पुर्ण झाल्यानंतर राहुल गांधी यांची पुढची बैठकीत होती. त्यांना भेटण्यासाठी काही नेते येणार होते. त्यामुळे ते बैठकीतून सर्वात आधी निघून गेले. ते नाराज होते. ते रागावून गेले या बातम्या चुकीच्या आहेत असेही पटोल यांनी स्पष्ट केले. मात्र सर्व जातींना प्रतिनिधीत्व दिले पाहीजे ही राहुल गांधी यांची भूमीका होती असं ते म्हणाले. दरम्यान सत्ता आल्यानंतर ज्यांना संधी मिळाली नाही त्यांनी काँग्रेस नक्कीच संधी देणार आहे असेही ते म्हणाले.    

ट्रेंडिंग बातमी - विधानसभेत महायुती किती जागा जिंकणार? फडणवीसांचा आकडा काय?

महाविकास आघाडीचे जागा वाटप जवळपास पुर्ण झाले आहे. अंतिम आकडेवारी पुढील एक दोन दिवसात स्पष्ट होईल. सध्या सहा ते सात जागांवर पेच असल्याचे ते म्हणाले. मात्र त्यातून मार्ग काढला जाईल. जागा वाटपात मित्र पक्षांना साभाळून घेणं हे राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसची जबाबदारी आहे. प्रादेशिक पक्षांना आपला पक्ष मोठा व्हावा असं वाटत असतं. त्यात गैर काही नाही. त्यामुळे जागा वाटपाची चर्चाही लांबल्याचे पटोले म्हणाले. मात्र महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 30 तारखेला आम्ही संयुक्त पत्रकार परिषद घेणार असल्याचेही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - NDTV Conclave LIVE : पंकजा मुंडेंना या चार मुद्द्यांवर करायचंय काम; सत्तेत आल्यानंतर पहिला निर्णय काय घेणार?

दरम्यान महाराष्ट्रात सत्ताबदल अटळ आहे असे नाना पटोले म्हणाले. महाराष्ट्रातल्या जनतेने सत्ताधाऱ्यांना खाली खेचण्याचे मन बनवले असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री कोण व्हावं हा काँग्रेससाठी दुय्यमबाब आहे. महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्रातल्या जनतेचे हित हे काँग्रेसला महत्वाचे आहे. भाजपकडून महाराष्ट्र रोज विकला जात आहे. महिलांची अब्रु लुटली जात आहे. विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे. उद्योग गुजरातला पळवले जात आहेत. त्यामुळे आधी महाराष्ट्र वाचवला पाहीजे. महाराष्ट्र सुरक्षित केला पाहीजे. आधी महाराष्ट्र सुरक्षित करू नंतर मुख्यमंत्री कोण ते ठरवू अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: