विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी तळकोकणात सभांचा धडाका लावला आहे. आधी सावंतवाडी आणि नंतर कणकवलीत त्यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी राणे पिता पुत्रांवर सडकून टीका केली. शिवाय महाराष्ट्र जिंकला तर दिल्लीच्या तख्तालाही तडे जातील असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले. कोकणात लोकसभेला शिवसेनेला पराभव स्विकारावा लागला. त्याचा सुड विधानसभेला घ्या असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. कणकवली विधानसभेसाठी त्यांनी संदेश पारकर यांच्यासाठी प्रचार सभा घेतली त्यावेळी ते बोलत होते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सभेच्या सुरूवाती पासूनच उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे आणि त्यांच्या दोन मुलांना लक्ष्य केले होते. बापाला डोक्यावर घेतलं आहे आणि आता दोन्ही मुलांना खांद्यावर घेणार आहात का? असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना केला. राणे यांना त्यांच्या उंची प्रमाणे केंद्रात खातं मिळालं होतं. पण त्यांच्या खात्या येवढा सुक्ष्म उद्योग तरी त्यांना कोकणात आणता आला का? असा प्रश्न त्यांनी यानिमित्तने केला. मोदींनी या मतदार संघात सभा घ्यावी. त्यात त्यांनी इथे घराणेशाही आहे की नाही ते सांगावे. त्या सभेत गुंडांच्या- दरोडेखोराच्या घराण्याचा अभिमानाने उल्लेख करणार आहात का असा प्रश्न त्यांनी मोदींना केला.
ट्रेंडिंग बातमी - मुख्यमंत्री येती घरी, खड्डे भरणीचा मुहूर्त ठरी!; अंबरनाथकरांमध्ये रंगली चर्चा
कोकणातल्या भस्मासुराला गाडायचं आहे. त्यासाठी शिवसेना एक आहे. उमेदवारी मिळावी म्हणून चार चार जण इच्छुक होते. पण त्यातल्या कुणीही बंडखोरी केली नाही. आता हे सर्वजण मिळून कोकणातल्या भस्मासुराचा नाश करतील असंही ते म्हणाले. कोकणात येताना रस्त्याने येवून दाखवा असं आव्हान कोणी तरी दिलं होतं असं राणे यांचे नाव न घेता ठाकरे म्हणाले. पण आव्हान कोणी द्यायचे असेत. जो मर्द असतो त्याने आव्हान द्यायचे असते. ह्यांचं कसलं आव्हान. आज इकडे तर उद्या तिकडे. अशा बोल घेवड्यांकडे लक्ष न दिलेले बरं. दिल्लीत जे दोन जण तुमच्या डोक्यावर बसले आहेत त्यांच्याकडून आधी मुंबई गोवा महामार्ग करून घ्या नंतर आव्हान द्या असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.
अनेक लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत. भाजपला वाटतं की शिवसेना संपली. जर शिवसेना संपली असेल तर अजूनही लोक का येत आहेत असा सवाल त्यांनी भाजपला केला. पण शिवसेनेला संपवण्याच्या नादात भाजप कोकण मुक्त झाली आहे त्याचं काय असंही ते म्हणाले. यावेळी नरेंद्र मोदींवर ही उद्धव यांनी टीका केली. मोदी मला नकली सनतान म्हणाले होते. एवढी तुमची मजल कशी काय गेली असा सवाल त्यांनी केला. हा बाळासाहेबांचा अपमान आहे. माँ चा अपमान आहे असं उद्धव म्हणाले. तुमच्यावरचे हे संस्कार कोणते असं ते म्हणाले.
यावेळी त्यांनी अमित शाह यांच्यावरही टीकेची झोड उठवली. अमित शाह शिवसेनेला नकली सेना म्हणतात. मग मी त्यांना बे अकली म्हणतो. शाह म्हणतात उद्धव ठाकरेंनी विकास होवू दिला नाही. मी त्यांना विचारतो की विकासाची व्याख्या काय आहे. महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला नेण्यासाठी बंदी घातली होती असे उद्धव यांनी शाह यांना सांगितले. दरम्यान कोकणात काही जण मस्तीत आहेत. धमक्या देत आहेत. गुंडगिरी करत आहेत. त्यांना पाडा त्यानंतर कोकणचा विकास होईल असं ही ते म्हणाले. जर महाराष्ट्र जिंकला तर दिल्लीच्या तख्तालाही तडे जातील असंही त्यांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world