Salman Khan Firing Case: सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना क्राइम ब्रांचने अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही आरोपींना सोमवारी (15 एप्रिल) रात्री उशीरा गुजरातमधील भूज परिसरातून अटक करण्यात आली. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, गोळीबार केल्यानंतर मुंबईतून पळ काढणाऱ्या दोन्ही आरोपींना गुजरातच्या भूज परिसरातून ताब्यात घेतले. विकी गुप्ता आणि सागर पाल अशी आरोपींची नावे आहेत. पुढील चौकशीसाठी या दोघांना मुंबईमध्ये आणण्यात येईल".
दरम्यान दोन्ही आरोपी बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे म्हटले जात आहे.
पनवेलमध्ये महिनाभरापासून राहत होते आरोपी
रिपोर्ट्सनुसार, बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारे दोन्ही आरोपी जवळपास महिनाभरापासून नवी मुंबईतील पनवेल परिसरामध्ये भाडेतत्त्वाच्या घरामध्ये राहत होते. याच परिसरात सलमानचेही फार्महाऊस आहे. या प्रकरणी पोलिसांनी नवी मुंबईतील तीन जणांची चौकशी केली. यामध्ये घरमालक, गुन्ह्यासाठी वापरलेल्या बाईकचा आधीचा मालक, बाईक विक्री करणारा एजंट आणि तपासाचा भाग म्हणून अन्य काही लोकांचीही चौकशी करण्यात आली.
Firing outside the residence of actor Salman Khan | Both the accused have been arrested by the Mumbai Crime Branch, from Gujarat's Bhuj: Mumbai Crime Branch
— ANI (@ANI) April 15, 2024
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानच्या घरापासून जवळपास एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या माउंट मेरी चर्चजवळ हल्लेखोरांनी वापरलेली बाईक सोडली आणि तेथून पळ काढला. या बाईकची नोंदणी पनवेल परिसरातील रहिवासी असणाऱ्या व्यक्तीच्या नावे आहे. पनवेलचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी सांगितले की, संबंधित व्यक्तीने नुकतीच ही बाईक दुसऱ्या व्यक्तीला विकली होती.
Firing outside the residence of actor Salman Khan | Visuals of the 2 accused who were arrested by Mumbai Crime Branch, from Gujarat's Bhuj
— ANI (@ANI) April 16, 2024
(Pic source - Crime Branch) https://t.co/WXRMhqlyVi pic.twitter.com/QoFdvWyMQn
वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर रविवारी (14 एप्रिल 2024) पहाटेच्या 5 वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली.
गोळीबारानंतर आरोपींनी गाठले वांद्रे रेल्वे स्टेशन
"पोलिसांनी ताब्यात घेतलेली बाईक पनवेलमध्ये राहणाऱ्या व्यक्तीच्या नावे नोंद करण्यात आली आहे. यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे जाऊन बाईकच्या मालकासह आणखी दोन जणांची चौकशी केली. दरम्यान चर्चजवळ बाईक सोडून काही अंतर चालल्यानंतर आरोपींनी वांद्रे रेल्वे स्टेशन गाठले. बोरिवलीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये आरोपी बसले पण ते सांताक्रूझ रेल्वे स्टेशनवर उतरले आणि बाहेर पडले. या प्रकरणी अन्य काही जणांचीही चौकशी करून त्यांचा जबाब नोंदवला आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज देखील तपासण्यात येत आहेत",अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
The two accused arrested in connection with the firing incident outside the residence of actor Salman Khan on April 14th have been identified as Vicky Gupta and Sagar Pal. pic.twitter.com/toIxqojhIo
— ANI (@ANI) April 16, 2024
पोलीस अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की, "बाईकचा आधीचा मालक, बाईक विक्रीमध्ये मदत करणारा एजंट आणि पनवेलच्या हरिग्राम परिसरात भाडेतत्त्वावर घर देणाऱ्या घरमालकाची चौकशी केली. हे घर आरोपींनी मार्च महिन्यात भाडेतत्त्वावर घेतले होते. दरम्यान या घटनेच्या तपासासाठी 12 हून अधिक पथके तयार केली आहेत, यातील काही पथके बिहार, राजस्थान आणि दिल्लीमध्ये पाठवण्यात आली आहेत. येथून आतापर्यंत आम्ही कोणालाही अटक किंवा ताब्यात घेतलेले नाही, पण अनेकांची चौकशी सुरू आहे."
#WATCH | Two accused identified as Vicky Gupta and Sagar Pal were arrested by the Mumbai Crime Branch from Gujarat's Bhuj, in connection with the firing incident outside the residence of actor Salman Khan.
— ANI (@ANI) April 16, 2024
(Source: Bhuj Police) pic.twitter.com/JdtXZVQrZj
आणखी वाचा
सलमान खानची सुरक्षा वाढवा, गोळीबारानंतर थेट PM मोदींकडे मागणी
सलमानच्या घरावरील गोळीबाराचा कट रचला अमेरिकेत, शूटर्सची निवड कशी करण्यात आली?
30 वर्षांपासून बेपत्ता असलेल्या अभिनेत्याची लेक दिसते इतकी सुंदर, लुकवर चाहते फिदा
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world