अभिनेत्री शर्मिन सहगल हिचे सध्या कौतुक होत आहे. शर्मिनने 'हिरामंडी' वेबसिरीजमध्ये केलेल्या कामामुळे तिचे कौतुक केले जात आहे. या वेबसिरीजमध्ये तिने आलमजेबची भूमिका साकारली आहे. शर्मिनने ईटाइम्सला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने सांगितले की अभिनेता सलमान खान याने तिला लग्नासाठी मागणी घातली होती.
मी 2-3 वर्षांची असताना गंमतीने सलमान खानने माझ्याशी मला लग्न करशील का? असं विचारलं होतं यावर मी काहीच उत्तर दिलं नव्हतं असं शर्मिनने हसत हसत सांगितलं.
( नक्की वाचा : सिनेमा किंवा डान्स नाही तर 'या' माध्यमातून होते सनी लियोनची कमाई, वाचा 115 कोटींच्या संपत्तीचं रहस्य )
नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या हिरामंडीमधील संपूर्ण स्टारकास्ट द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये बघायला मिळाली होती. या शोमध्ये बोलताना शर्मिनने सांगितले की संजय लीला भंसाळी यांची भाची असूनही मला ऑडिशन द्यावी लागली होती. आलमजेबच्या भूमिकेसाठी मी 16 वेळा ऑडिशन दिली होती असं तिने म्हटले आहे. यापूर्वी शर्मिनने तिच्या लूक टेस्टचे फोटोही शेअर केले आहेत. '
( नक्की वाचा : सलमान खानच्या या सिनेमांची बॉक्स ऑफिसवर दिसेल जादू, पठाण-गदर चित्रपटांचा मोडणार रेकॉर्ड? )
आलमजेब लूक टेस्ट' असं कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले असून या पोस्टमध्ये तिने काही इमोजीही शेअर केले आहेत. शर्मिनच्या अभिनयावर काही दिवसांपूर्वी टीका झाली होती. तिच्या चेहऱ्यावर कोणतेही हावभाव नसल्याचे म्हटत टीकाकारांनी तिला ट्रोल केले होते. यामुळे शर्मिनने इन्स्टाग्राम पोस्टवरील कॉमेंट बंद केल्या होत्या.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world