जाहिरात

रांची येथे INDIA आघाडीच्या रॅलीमध्ये दोन गटात हाणामारी

रांची येथे INDIA आघाडीच्या रॅलीमध्ये दोन गटात हाणामारी
रांची येथे INDIA आघाडीच्या रॅलीमध्ये दोन गटात हाणामारी
झारखंड:

इंडिया आघाडीच्या मेगा रॅलीत दोन गटातील कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचा व्हिडिओ पीटीआय या वृत्तसंस्थेकडून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये कार्यकर्ते एकमेकांवर खुर्च्यांनी हल्ला करताना दिसत आहेत. हा हाणामारीचा प्रकार इतका टोकाला गेला की, यामध्ये एका कार्यकर्त्याचा डोक्यातून रक्त येताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.

झारखंडची राजधानी रांचीमध्ये रविवारी (21 एप्रिल) इंडिया आघाडीच्या मेगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. उलगुलानमध्ये काढण्यात आलेल्या या रॅलीपूर्वी बराच गदारोळ झाला. दोन गटातील कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यांच्यात जोरदार हाणामारी ही झाली. दोन्ही गटांनी एकमेकांवर खुर्च्या फेकत मारहाण केली. पीटीआय या वृत्तसंस्थेने या गोंधळाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कार्यकर्ते एकमेकांवर खुर्च्यांनी हल्ला करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये एका कार्यकर्त्याचा डोक्यातून रक्त येताना दिसत आहे. 

(नक्की वाचा : उत्तर प्रदेशात लोकसभा मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी भाजप उमेदवाराचं निधन)

काँग्रेस आणि राजदच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

युतीचे नेते जनतेला संबोधित करत असताना ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. त्यादरम्यान राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये काही मुद्द्यावरून हाणामारी झाली. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खुर्च्या, लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला. तेथे उपस्थित लोक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत काही लोक जखमी झाले होते. त्यामुळे रॅलीत गोंधळ निर्माण झाला. लोक धावू लागले. यादरम्यान अनेक लोक जमिनीवर ही कोसळले.

(नक्की वाचा : ओमराजे निंबाळकर-राणा जगजितसिंह पाटलांमध्ये जुंपली, वैद्यकीय खर्चांवरुन आरोप-प्रत्यारोप)

काँग्रेस उमेदवाराच्या भावाचे फुटले डोके 

वृत्तानुसार, चतरा येथून इंडिया आघाडीचा भाग असलेले काँग्रेस उमेदवार केएन त्रिपाठी यांच्या गटाशी राजदच्या कार्यकर्त्यांची चकमक झाली. या हाणामारीत केएन त्रिपाठी यांचा भाऊ गोपाल त्रिपाठी यांच्या डोक्याला दुखापत झाली. ते म्हणाले की 10-15 बाहेरचे लोक रॅलीला आले होते. याच लोकांनी अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला मुद्दाम करण्यात आला आहे असं त्यांचं म्हणणं आहे.

(नक्की वाचा : राज यांना ठाकरे गटाने डिवचले, चौकातच थेट व्यंगचित्र लावले)

राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे मंचावर उपस्थित नाही

झारखंडची राजधानी रांचीमध्ये आज इंडिया आघाडीचं शक्तीप्रदर्शन होणार होतं. त्यासाठी विरोधी पक्षनेत्यांच्या मेळाव्याला सुरुवात झाली आहे. रांची येथील प्रभात तारा मैदानावर इंडिया आघाडीची रॅली आयोजित करण्यात आली आहे. व्यासपीठावर लालू यादव, अखिलेश यादव, राहुल गांधी, तेजस्वी यादव, भगवंत मान, मल्लिकार्जुन खर्गे, सुनीता केजरीवाल, उद्धव ठाकरे आदी नेते सहभागी होणार असल्याची माहिती होती. पण, आता या शक्तिप्रदर्शनात राहुल गांधी आणि उद्धव टाकरे सहभागी होणार नसल्याची माहिती समोर येत आहे.

(नक्की वाचा : राहुल गांधींची तब्येत अचानक बिघडली; मध्य प्रदेश, झारखंड दौरा रद्द)

राहूल गांधी हजर न राहण्याचे कारण काय? 

राहुल गांधी या रॅलीत सहभागी होत नसल्याबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी  ट्विटरवर एक पोस्ट टाकली आणि लिहिले, 'राहुल गांधी आज सतना आणि रांचीमध्ये निवडणूक प्रचारासाठी पूर्णपणे तयार होते, जिथे इंडिया आघाडीची रॅली होत आहे, मात्र, त्यांची तब्येत अचानक बिघडली आणि सध्या ते दिल्लीबाहेर जाऊ शकत नाही. सतना येथील जाहीर सभेला संबोधित केल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रांचीच्या सभेला उपस्थित राहणार आहेत.

नक्की पाहा : 

फडणवीस आदित्यला मुख्यमंत्री बनवणार होते? उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर देवेंद्र म्हणाले, मला वेड..

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
रतन टाटांच्या लाडक्या कुत्र्यानंही घेतलं अंत्यदर्शन, वाचा का ठेवलं 'गोवा' नाव?
रांची येथे INDIA आघाडीच्या रॅलीमध्ये दोन गटात हाणामारी
Noida Man On Solo Bike Ride In Ladakh Dies due to Altitude Sickness
Next Article
लेहमध्ये सोलो ट्रिपसाठी गेला, मात्र परतलाच नाही; तरुणांसोबत नेमकं काय घडलं?