जाहिरात

VIDEO : रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरला रुग्णालयात लोळवून मारलं, कारण ऐकून तुम्हालाही संताप येईल

एफआयआरमध्ये आरोपींनी डॉक्टरांना जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. पोलीस अधिक तपास करत आहेत. 

VIDEO : रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरला रुग्णालयात लोळवून मारलं, कारण ऐकून तुम्हालाही संताप येईल

गुजरातच्या भावनगरमधील सिहोर येथील एका खासगी रुग्णालयात चप्पल काढायला सांगितली म्हणून डॉक्टरला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी ही मारहाण केली आहे.

रुग्णालयाच्या आपत्कालीन कक्षामध्ये जाण्यापूर्वी डॉक्टरांनी रुग्णासोबत आलेल्या तरुणांना चप्पल काढण्यास सांगितले होते. यावरून तरुण इतका संतापलेल्या तरुणांनी डॉक्टर आणि तिथे उपस्थित असलेल्या नर्सिंग स्टाफला बेदम मारहाण केली. पोलिसांनी तिघा तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. 

(नक्की वाचा - कोल्हापूर-पुणे अंतर होणार कमी, वंदे भारत एक्सप्रेसचा आज शुभारंभ; किती असणार तिकीट? )

भावनगर शहरातील श्रेया नावाच्या हॉस्पिटलमध्ये 12 सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती. एका पोलीस अधिकाऱ्याने याबाबत सांगितले की, तीन आरोपी जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी आले होते. हे तिघे तरुण रुग्णालयाच्या आपत्कालीन कक्षात प्रवेश करत असताना तेथे उपस्थित डॉक्टर जयदीप सिंग गोहिल यांनी त्यांना चप्पल बाहेर काढण्यास सांगितले. याचा राग आल्याने तरुणांनी शिवीगाळ सुरू केली. प्रकरण इतके वाढले की तरुणांनी डॉक्टरला बेदम मारहाण केली.

(वाचा-  Pune Traffic : गणेश मिरवणुकीसाठी पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल; प्रमुख 17 रस्ते राहणार बंद )

आरोपींनी तिथे ठेवलेली औषधे आणि इतर उपकरणांचीही तोडफोड करून रुग्णालयात गोंधळ घातला.  एफआयआरमध्ये आरोपींनी डॉक्टरांना जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
CM Arvind Kejriwal resigns : केजरीवाल का देत आहेत राजीनामा? काय आहे खरं कारण?
VIDEO : रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरला रुग्णालयात लोळवून मारलं, कारण ऐकून तुम्हालाही संताप येईल
Railways changed the name of Vande Metro, Namo Bharat Rapid Rail latest Update
Next Article
वंदे मेट्रो ट्रेनचं नाव बदललं, भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय