जाहिरात

Garlic Benefits: लसूण खाल्ल्यास कोणते आजार दूर होतील आणि कोणत्या आजारांमध्ये लसूण खाणे टाळावे?

Garlic Benefits: तुम्हाला देखील लसूण खाणे पसंत आहे का? लसूण खाल्ल्यास कोणते आजार दूर होतात तसेच कोणत्या आजारांमध्ये लसूण खाणे टाळलं पाहिजे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

Garlic Benefits: लसूण खाल्ल्यास कोणते आजार दूर होतील आणि कोणत्या आजारांमध्ये लसूण खाणे टाळावे?
Garlic Benefits In Marathi: लसूण खाणे योग्य की अयोग्य?

Garlic Benefits: भारतातील प्रत्येक घरामध्ये स्वयंपाकासाठी लसणाचा वापर आवर्जून केला जातो. लसणामुळे खाद्यपदार्थांची चव वाढते आणि आजारांपासूनही शरीराचे संरक्षण होते. सर्दी,रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी लसणचा वापर प्राचीन काळापासून केला जात आहे. लसूण खाल्ल्यास कोणते आजार बरे होतात आणि कोणत्या आजारांमध्ये लसूण खाणे टाळले पाहिजे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया..

लसूण खाल्ल्यास या कॅन्सरचा धोका टळतो?

- 55 ते 69 वयोगटातील  41 हजार महिलांवर करण्यात आलेल्या नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या अभ्यासानुसार, ज्या महिला नियमितपणे लसूण, फळे आणि भाज्यांचे सेवन करतात. त्या महिलांना कोलन कॅन्सर होण्याचा धोका 35 टक्के कमी असतो. 

- यासह कित्येक रीसर्चमधील माहितीनुसार, लसणामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत. यामुळे लसणाचे तेल वापरल्यास दीर्घकाळापासून सुरू असलेल्या स्नायू आणि सांधेदुखीच्या समस्येतून सुटका मिळेल. लसणाचे तेल वापरुन हलक्या हाताने मसाज करावा. 

(नक्की वाचा: Garlic Benefits: रिकाम्या पोटी लसूण खायचंय? जाणून घ्या योग्य पद्धत)

- संशोधनातील माहितीनुसार लसणातील औषधी गुणधर्मामुळे धमन्या आणि रक्तदाबावरही सकारात्मक परिणाम होऊ शकतात. 

- लाल रक्तपेशी लसणातील सल्फरचे हायड्रोजन सल्फाइड वायूमध्ये रूपांतर करतात. ज्यामुळे रक्तवाहिन्या विस्तारतात आणि रक्तदाब नियंत्रित येणे सोपे होते; असे संशोधकांचे म्हणणंय.

(नक्की वाचा: How to Eat Raw Garlic: अख्खे की ठेचलेले, लसूण खाण्याची योग्य पद्धत कोणती?)

कोणत्या आजारांमध्ये लसूण खाणे टाळावे?|In Which Disease You Should Not Garlic| Lasun Khanyache Dushparinam 

  • लसूण खाणे आरोग्यासाठी पोषक मानले जाते. पण अ‍ॅसिडिटी, पोट फुगणे यासारख्या समस्या असणाऱ्यांना लसूण न खाण्याचा सल्ला दिला जातो.  
  • तसेच जे लोक रक्त पातळ होण्यासाठी औषधोपचार करत आहेत, त्यांनीही लसूण खाणे टाळावे.
  • यकृताचे आजार असणाऱ्यांनी लसूण खाऊ नये. 
  • गर्भवती किंवा स्तनदा महिलांना लसूण न खाण्याचा सल्ला दिला जातो.  
  • शस्त्रक्रिया होणार असल्यास लसूण खाणे टाळावे.  
  • रक्तस्त्राव विकार, मूळव्याध यासारख्या समस्या असणाऱ्यांनाही लसूण खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. 
  • लसणाची अ‍ॅलर्जी असणाऱ्यांनी चुकूनही लसूण खाऊ नये.

(नक्की वाचा: Fermented garlic Benefits: चेहऱ्यावर काचेसारखा ग्लो हवाय, रोज खा आंबवलेले लसूण)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com