जाहिरात

Ratnagiri News: अकलूजच्या नायब तहसीलदारांच्या गाडीला भीषण अपघात, कार खोल दरीत कोसळली

Nayab Tahsildar Car Accident : रवीकिरण कदम हे त्यांच्या खासगी कारने सोमवारी चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली घाटमार्गे चिपळूणच्या दिशेने येत होते.

Ratnagiri News: अकलूजच्या नायब तहसीलदारांच्या गाडीला भीषण अपघात, कार खोल दरीत कोसळली

गुरुप्रसाद दळवी, रत्नागिरी

सोलापूरच्या अकलूजचे नायब तहसीलदार रवीकिरण कदम यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे. कार खोल दरीत कोसळून हा अपघात झाला आहे. या अपघतात रवीकिरण कदम हे गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात हा अपघात झाला. 

(नक्की वाचा-  अटी-शर्थी लागू केल्या, छाननी केली; मात्र 'लाडकी बहीण' लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढली)

रवीकिरण कदम हे त्यांच्या खासगी कारने सोमवारी चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली घाटमार्गे चिपळूणच्या दिशेने येत होते. घाटातील एका अवघड वळणावर आले असताना त्यांची कार थेट खोल दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य सुरु केले. दोरी टाकून पोलीस दरीत उतरले. 

Car accident

Car accident

(नक्की वाचा : मंगेशकर हॉस्पिटलचा निर्दयीपणा! तनिषा भिसेंंच्या मृत्यूला जबाबदार कोण? अहवालात धक्कादायक खुलासा)

रवीकिरण कदम यांच्यापर्यंत पोलीस कसेबसे पोहोचले. यावेळी कारमध्ये कदम गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांना बाहेर काढून कराड येथे उपचारासाठी नेण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनंत साळवी, अन्य ग्रामस्थांनी पोलिसांनी मदत केली.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: