जाहिरात

Akola News: जेवणाच्या बहाण्याने बोलावले, डोळ्यात मिरची पूड फेकत हत्या; अक्षय नागलकरला क्रूरपणे संपवला

Akola News: जेवणाच्या बहाण्याने बोलावले, डोळ्यात मिरची पूड फेकत हत्या; अक्षय नागलकरला क्रूरपणे संपवला
अकोला:

योगेश शिरसाट

Akshay Nagalkar Murder Case:  अकोल्यातील बहुचर्चित अक्षय नागलकर बेपत्ता प्रकरणाचा उलगडा अखेर पोलिसांनी केला आहे. डाबकी रोड पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये हे प्रकरण खुनाचे (Murder Case) असल्याचे निष्पन्न झाले आहे. जुन्या वैमनस्यातून एकूण आठ आरोपींनी अक्षय नागलकरची हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे.

नक्की वाचा: हसवणारा चेहरा हरपला! 'साराभाई' फेम सतीश शाह यांचे निधन; बॉलिवूडवर शोककळा

मृतदेह जाळत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी सांगितले की, अक्षय नागलकरला एमएच 30 हॉटेलवर बोलावून त्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून कोयत्यासारख्या शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर, कोणताही पुरावा मागे राहू नये यासाठी आरोपींनी मृतदेह मोरगाव भाकरे येथील शेत शिवारातील टीनच्या शेडमध्ये नेऊन जाळला. केवळ जाळला नाही, तर राख हटवून शेड आतून धुऊन रंगही दिला.

नक्की वाचा: प्रपोज, सहकुटुंब देवदर्शन, धक्कादायक LOVE अँगल? डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येत नवा ट्वीस्ट!

गुन्ह्याची उकल करण्यासाठी 6 पथके

या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखाली सहा टीम तयार करण्यात आल्या होत्या. या टीमने अवघ्या 48 तासांत अत्यंत कमी वेळात गुन्ह्याचा छडा लावला. पोलिसांनी चंद्रकांत बोरकर, ब्रह्मा भाकरे, कृष्णा भाकरे आणि आशु वानखडे या चार (4) आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. उर्वरित चार (4) आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

अक्षय नागलकरला कोणी मारले ?

23 ऑक्टोबर रोजी डाबकी रोड पोलीस ठाण्यात शिला विनायक नागलकर यांनी फिर्याद दाखल केली होती की, त्यांचा मुलगा अक्षय विनायक नागलकर (वय 26, रा. मारोती नगर, जुने शहर, अकोला) हा 22 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घराबाहेर गेला व परत आला नाही. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी तत्काळ विशेष पथकांची नियुक्ती केली. उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा तसेच डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या एकूण आठ पथकांना जिल्हा तसेच जिल्हा बाहेर शोधमोहिमेसाठी रवाना करण्यात आले होते. या पथकांनी सतत 48 तास अथक परिश्रम घेत गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित चंद्रकांत महादेव बोरकर यास ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने कबुली दिली की, त्याने आणि त्याचे सहकारी  ब्रम्हा भाकरे, रोहित पराते, किष्णा भाकरे, आशु वानखडे, शिवा माळी, आकाश शिंदे, आणि अमोल उन्हाळे  यांनी एकत्रितपणे अक्षय नागलकरचा खून केला.

8 पैकी 4 आरोपी सापडले

चंद्रकांत बोरकरने पोलिसांना माहिती देताना म्हटले की, ब्रम्हा भाकरे याच्या भौरद येथील ‘MH 30' हॉटेलमध्ये जेवणाच्या बहाण्याने अक्षय नागलकर याला आशु वानखडे याने बोलावले होते. बोरकर आणि त्याच्या साथीदारांनी जुन्या वादातून अक्षय नागलकर याला हॉटेलमध्येच ठार मारला.  त्यानंतर या सगळ्यांनी अक्षयचा मृतदेह ब्रम्हा भाकरेच्या मोरगाव भाकरे येथील शेतात उभारलेल्या टीनच्या शेडमध्ये जाळला. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी टीनच्या शेडला कलर मारला होता.  पोलिसांनी या प्रकरणात चंद्रकांत बोरकर, ब्रम्हा भाकरे, किष्णा भाकरे आणि आशु वानखडे या चौघांना ताब्यात घेतलं आहे.  

चंद्रकांत बोरकर हा कुख्यात आरोपी

दरम्यान, चंद्रकांत बोरकर हा पूर्वीपासूनच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला कुख्यात आरोपी असल्याचे समोर आले आहे. दोन दशकांपूर्वी झालेल्या सेक्स कॅण्डल प्रकरणातील तो मुख्य आरोपी होता. गुन्हा करून पुरावे नष्ट करून स्वतःहून पोलीस ठाण्यात उपस्थित होण्याची सवय असल्याचेही पोलिसांच्या नोंदीतून स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी अक्षय नागलकर आणि चंद्रकांत बोरकर यांच्यात काही कारणावरून वाद झाल्याचेही तपासात उघड झाले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com