जाहिरात

Kolhapur Politics : भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल, 'ते' वक्तव्य भोवलं

case filed against BJP mp Dhananjay Mahadik : धनंजय महाडिक यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. 

Kolhapur Politics : भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल, 'ते' वक्तव्य भोवलं

विशाल पुजारी, कोल्हापूर

कोल्हापुरात एका जाहीर प्रचारसभेत शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी खासदार धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. धनंजय महाडिक यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जुना राजवाडा पोलीस ठाण्यात या गुन्ह्यची नोंद करण्यात आली आहे. कोल्हापूर दक्षिण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी महाडिक यांना तत्काळ खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर महाडिक यांनी खुलासा दिला. पण महाडिक यांचा खुलासा अमान्य करीत त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला.

ट्रेंडिंग बातमी - शहाजी बापूंच्या गडात उद्धव ठाकरेंचं 'काय झाडी काय डोंगर' सभा गाजवली

काय म्हणाले होते धनंजय महाडिक?

धनंजय महाडिक यांनी एका सभेत लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत म्हटलं होतं की,  सरकारने आणलेल्या लाडक्या बहीण योजनेला महिलांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मात्र असं असतानाही काँग्रेस याला विरोध करत आहे. त्यामुळे या योजनेचा फायदा घेऊन ज्या महिला काँग्रेस रॅलीत सहभागी होतील त्यांचे फोटो काढा. मी त्यांची व्यवस्था करतो, असं धनंजय महाडिक यांनी म्हटलं होतं.

ट्रेंडिंग बातमी - 'अमित शाह म्हणजे मुन्ना भाई MBBS मधले...' ठाकरेंनी खडे-खडे सुनावले

वादग्रस्त वक्तव्यानंतर माफीनामा

चहुबाजूने टीकेची झोड उठल्यानंतर महाडिक यांनी जाहीर माफी मागितली. धनंजय महाडिक यांनी आपल्या माफिनाम्यात म्हटलं की, "सर्वप्रथम माझ्या वक्तव्याने कुठल्याही माता भगिनींचे मन दुखावले असेल तर त्यांची मी बिनशर्त माफी मागतो. माझे हे वक्तव्य कुठल्याही माता भगिनीचा अपमान करण्यासाठी मुळीच नव्हते. तर निवडणूक काळात राजकीय प्रचार करताना विरोधी पक्षाच्या खोट्या प्रचाराला बळी पडणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजना ही फक्त महायुती सरकारमुळेच यशस्वी झाली असल्याचे ठामपणे नमूद करताना विशेषतः वोट जिहाद करणाऱ्या महिलांच्या प्रती आलेली स्वाभाविक प्रतिक्रिया आहे." 

"मी माझ्या वैयक्तिक, राजकीय आयुष्यात महिलांचा नेहमीच सन्मान करत आलेलो आहे. मी आणि माझ्या पत्नीमार्फत गेली अनेक वर्षे भगीरथी महिला संस्थेमार्फत महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी नेहमीच चांगले काम करत आलो आहे आणि ह्या पुढे देखील करत राहीन. महिलांचा सन्मान आणि सशक्तीकरणबाबत माझ्या ह्या प्रयत्नांची दखल घेऊन माझ्या वक्तव्याने मन दुखावलेल्या माझ्या भगिनी मला मोठ्या मनाने माफ करतील, अशी आई अंबाबाई चरणी मी प्रार्थना करतो", असंही महाडिक यांनी म्हटलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com