
स्वानंद पाटील, बीड
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा क्रूरपणे झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता. संतोष देशमुख यांना झालेल्या मारहाणीचे फोटो समोर आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली. त्यानंतर बीडमधील विविध नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या मुजोरीने अनेक व्हिडीओ समोर आले. दरम्यान संतोष देशमुख यांचा नातेवाईक असलेल्या

यांनी देखील एका व्यक्तीस बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दादासाहेब खिंडकर संतोष देशमुख हत्या प्रकरणात देशमुख कुटुंबीयांच्या वतीने बाजू देखील मांडत होते. मात्र या मारहाणीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला. याप्रकरणी आता दादासाहेब खिंडकरांसह सात आरोपींवर 307 आणि किडनॅप केल्याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
(नक्की वाचा- बीडमधील पाचवा संतापजनक Video; आता तर क्रौर्याची हद्दच गाठली!)
बीडच्या बाबुळगावचे सरपंच दादासाहेब खिंडकर यांनी गावातीलच ओमकार सातपुते या तरुणाला अमानुष मारहाण केली होती. मागील वर्षी ही मारहाण झाल्याचे समोर आले आहे. मात्र या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. दादासाहेब खिंडकर ओमकार सातपुतेला काठीने मारहाण करत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे.
ओमकार सातपुते याने मारहाण प्रकरणी बीडच्या पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये दादासाहेब खिंडकर सह इतर 7 जणांवर 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर किडनॅप केल्याप्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घुगे यांनी ही माहिती दिली आहे. आरोपींच्या शोधासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world