जाहिरात

Bankers Meeting: 'शेतकऱ्यांना सिबील मागू नका', CM देवेंद्र फडणवीसांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना झापलं

महाराष्ट्र आता स्टार्ट अपची राजधानी होतेय, त्यामुळे तेथेही लक्ष दिले तर रोजगारनिर्मिती मोठ्या संख्येने होईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

Bankers  Meeting: 'शेतकऱ्यांना सिबील मागू नका', CM देवेंद्र फडणवीसांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना झापलं

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांकडे वारंवार होणाऱ्या सी बीलावरुन बँकांना चांगलेच फटकारले. शेतकऱ्यांसाठी आणि या योजनांमध्ये चांगले काम करणाऱ्यांना सन्मानित करा, जे करणार नाही, त्यांची नावे घ्या, त्यांच्यावर पुढच्या बैठकीत नाराजी व्यक्त करा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

"शेतकऱ्यांना सीबिल मागू नका, हे वारंवार सांगितले, तुम्ही तरी मागता.  त्यावर तोडगा सांगा. आम्ही अशा बँकावर एफआयआर पण केले. पण तुम्हालाच हे गांभीर्याने घ्यावे लागेल. रिझर्व्ह बँकेने सुद्धा स्पष्ट केले आहे, जर कोणती बँक शाखा सी-बिल मागत असेल तर त्या शाखेवर कारवाई करण्यात येईल, असा निर्णय मला आज हवा आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  ॲक्सिस, आयसीआयसीआय, एचडीएफसी बँकेच्या अधिकाऱ्यांना फटकारले.

यावेळी दुष्काळी परिस्थिती नाही, त्यामुळे पीक चांगले येणार आहे असं संकेत दिसे आहेत. अशात बँकांना शेतकऱ्यांना अधिक सहकार्य करायला हवे. FPO महाराष्ट्रात मोठ्या संख्येने आहे. सर्वात गुंतवणुकीचा मोठा ओघ राज्यात आहे. दावोसमधून 16 लाख कोटींची गुंतवणूक झाली आहे. महाराष्ट्र आता स्टार्ट अपची राजधानी होतेय, त्यामुळे तेथेही लक्ष दिले तर रोजगारनिर्मिती मोठ्या संख्येने होईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

(नक्की वाचा-  Pune News : सुनेची आत्महत्या, छळ केल्याचा आरोप; राष्ट्रवादीच्या नेत्यासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल)

तसेच गडचिरोलीवर अधिक लक्ष केंद्रित करा. तेथे उद्योग जाळे तयार होते आहे. बँकांनी आपले प्राधान्यक्रम सरकारच्या सोबतीने ठरवले तर समग्र विकास होईल. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना अंमलात आणणे ही बँकाची सुद्धा जबाबदारी, त्यातूनच आर्थिक सर्व समावेशकता साधली जाईल, असे म्हणत शेतकऱ्यांसाठी आणि या योजनांमध्ये चांगले काम करणाऱ्यांना सन्मानित करा, जे करणार नाही, त्यांची नावे घ्या, त्यांच्यावर पुढच्या बैठकीत नाराजी व्यक्त करा, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. दरम्यान,  तसेच 44,76,804 कोटी रुपयांचा वार्षिक पतपुरवठा आराखडाही आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. 

Dhule News: अवकाळीचा शिक्षण विभागाला फटका! कार्यालयात पाणीच पाणी, महत्वाच्या फाईल्स भिजल्या

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com