जाहिरात

'पोकळ धमक्यांना घाबरत नाही, एकदा नव्हे १० वेळा तुरुंगात जाईल...' अकोल्यात CM शिंदेंची तोफ धडाडली

उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवर सडकून टीका केली, तसेच महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीचेच सरकार येईल, असा विश्वासही CM शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. 

'पोकळ धमक्यांना घाबरत नाही, एकदा नव्हे १० वेळा तुरुंगात जाईल...' अकोल्यात CM शिंदेंची तोफ धडाडली
अकोला:

राज्यभरात सध्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचार सभांचा धडाका सुरु आहे. एकीकडे उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते महाराष्ट्र पिंजून काढत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांच्याही राज्यभरात सभा सुरु आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अकोल्याच्या बाळापूरमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवर सडकून टीका केली, तसेच महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीचेच सरकार येईल, असा विश्वासही CM शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. 

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे? 

"महाराष्ट्रामध्ये गेले दोन वर्ष आपण महायुती म्हणून काम करतोय. आपला विकासाचा अजेंडा आहे, अनेक कल्याणकारी योजना राबवल्या. एकनाथ शिंदेंनी शब्द दिला की शब्द मागे घेत नाही. एक बार मैने कमिटमेंट करदी तो मैं खुद की भी नही सुनता,तशी बाळासाहेबांची शिकवण आहे. दोन वर्षांपूर्वी आम्ही उठाव केला. या राज्यामध्ये संघर्ष झाला. सर्व सामान्य माणसांच्या मनातले सरकार एकनाथ शिंदेंने आणून दाखवले. महाराष्ट्राच्या जनतेने भाजप- शिवसेनेला मतदान केले. सरकारही भाजप- शिवसेनेचे यायला पाहिजे होते. मात्र जनतेशी गद्दारी कोणी केली?" असा सवाल यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित केला. 

उद्धव ठाकरेंवर निशाणा... 

"शिवसेना चोरली, धनुष्यबाण चोरली म्हणता, लहान मुलांसारखं का रडता? तुम्ही झोपला होता का? धनुष्यबाण उचलायला मनगटात ताकद लागते. सत्ता सोडायला हिंमत लागते. सत्ता सोडण्याची हिंमत तुमच्या एकनाथ शिंदेंनी दाखवली. जिथे बाळासाहेबांचे विचार तोडले, मोडले जात होते, शिवसैनिक जेलमध्ये जात होते, खच्चीकरण होत होते. मग मी बुक्क्यांचा मार सहन करत राहिलो असतो तर तुम्हाला बरं वाटले असते का? शिवसेना आणि धनुष्यबाण बाळासाहेबांचेच  आहे. बाळासाहेबांचा धनुष्यबाण जो उबाठाने काँग्रेसकडे गहाण ठेवला होता, तो आम्ही सोडवला," असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी लगावला. 

'मविआला इशारा...'

" आपला पक्ष नेत्यांचा नाही, कार्यकर्त्यांचा नाही. जो काम करेगो वो आगे जायेगा, राजा का बेटा राजा नही बनेगा, जो काम करेगा वो आगे बडेगा! अडीच वर्षात महाविकास आघाडीने अनेक प्रकल्प बंद पाडले. सगळ्या प्रकल्पात खोडा घातला, सगळीकडे स्पीडब्रेकर लावले. पण आपले सरकार आल्यानंतर सगळे स्पीड ब्रेकर हटवले आणि कामाला चालना दिली. महाविकास आघाडीचे नेते लाडकी बहीण योजनेवर टीका करतात. आमचे सरकार आल्यानंतर या योजनेची चौकशी करु, दोषींवर कारवाई करु म्हणतात. पण  पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, लाडक्या बहिणींसाठी जेलमध्ये जायची वेळ आली तर हा एकनाथ शिंदे एकदा नव्हे १० वेळा तुरुंगात जाईल, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com