
लक्ष्मण सोळुंके, जालना
Jalna News : शेतीसाठी रस्ता मागायला गेलेल्या शेतकऱ्याला महिला तहसीलदापराने अपमानास्पद वागणूक दिली. अपमान सहन न झाल्याने तहसील कार्यालयाच्या आवारात शेतकऱ्याला ब्रेन स्ट्रोक आल्याचा आरोपी कुटुंबीयांना केला आहे. शेतकऱ्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात मागील 10 दिवसांपासून उपचार सुरू आहेत. केशवराव व्यंकटराव मदन असं 65 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
केशवराव यांचा शेतातील रस्ता शेजारील शेतकऱ्याने अडवला होता. शेतातील ऊस कारखान्यावर नेता यावा म्हणून रस्ता मिळावा यासाठी त्यांनी तहसीलदार यांच्याकडे दाद मागितली. मात्र केशवराव यांना महिला तहसीलदार अश्विनी डमरे यांनी अपमानस्पद वागणून दिल्याचा आरोपी त्यांच्या कुटुंबीयांना केला आहे.
(नक्की वाचा- Water Crises : राज्यात पाणीटंचाई वाढली; 16 जिल्ह्यांत अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा)
केशवराव मदन यांची भराड खेडा शिवारात गट क्रमांक 125 मध्ये शेत जमीन आहे. शेतातील ऊस कारखान्यावर घेऊन जाता यावा म्हणून त्यांनी बदनापूर तहसीलदार यांच्याकडे रस्त्याच्या मागणीसाठी गेल्या दीड वर्षांपूर्वी अर्ज केला होता. काल ते तहसीलदार अश्विनी डमरे यांना भेटण्यासाठी गेले असता तहसीलदार यांनी त्यांना तुला रस्ता मिळणार नाही, जा कुठल्या आमदार, खासदार मंत्र्यांकडे जायचं जा, असं म्हणत त्यांना आपमानस्पद वागणूक दिली आणि ऑफिसबाहेर काढलं.
त्यानंतर तहसील कार्यालयाच्या आवारातच केशवराव यांना चक्कर आली. ओळखीच्या लोकांनी त्यांच्या नातेवाईकांना फोन करून याबाबत माहिती दिली. नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील हेडगेवार रुग्णलयात दाखल केले. तेथे त्यांना ब्रेन स्ट्रोक झाल्याचे निष्पन्न झाले.
( नक्की वाचा : ओढणीनं आवळला गळा, मृतदेह घेऊन बाईकवर फिरले, प्रियकरासोबत पकडलं म्हणून YouTuber नं घेतला नवऱ्याचा जीव )
तहसीलदार यांनी त्यांना आपमानस्पद वागणूक दिल्यानेच त्यांच्यावर ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यांच्या जीविताला धोका झाल्यास तहसीलदार, एसडीएम, तलाठी जबाबदार राहतील, असा इशारा मुलगा अमोल मदन यांनी केला. तसेच तहसीलदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणीही नातेवाईकांनी केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world