जाहिरात

एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदेंनी माझी पारख केली; पण... काँग्रेसमध्ये घरवापसी केलेल्या प्रदीप पाटलांना काय खुपलं? 

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रदीप पाटील (Pradeep Patil) यांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात घरवापसी केली आहे.

एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदेंनी माझी पारख केली; पण... काँग्रेसमध्ये घरवापसी केलेल्या प्रदीप पाटलांना काय खुपलं? 
अंबरनाथ:

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रदीप पाटील (Pradeep Patil) यांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात घरवापसी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी माझी पारख केली होती. पण खालच्यांनी मला सतत अपमानास्पद वागणूक देऊन मला अडचणीत आणण्याचं काम केलं. त्यामुळेच मी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून आता अंबरनाथ काय आहे, ते दाखवून देऊ आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणू, अशी प्रतिक्रिया प्रदीप पाटील यांनी दिली आहे.

प्रदीप पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या 8 ते 10 नगरसेवकांसह काँग्रेसमधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीत अंबरनाथ शहरातून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना मताधिक्य मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. मात्र त्यानंतर पक्षांतर्गत घडलेल्या काही घडामोडींमुळे प्रदीप पाटील हे नाराज होते.

विधानसभा निवडणुकीत RSS च्या 'स्पेशल 65' ची एन्ट्री, काय आहे 'सजग रहो' अभियान?

नक्की वाचा - विधानसभा निवडणुकीत RSS च्या 'स्पेशल 65' ची एन्ट्री, काय आहे 'सजग रहो' अभियान?

त्यातूनच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच त्यांनी आता पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी माजी पारख केली होती. मात्र खालच्या लोकांना ते समजलं नाही, त्यांनी मला सतत अपमानास्पद वागणूक देऊन मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मी आता काँग्रेसमध्ये आलो असून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पूर्ण ताकदीने निवडून आणणार आहे, अशी प्रतिक्रिया प्रदीप पाटील यांनी दिली.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: