जाहिरात
2 days ago

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique ) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. तर एक जण फरार आहे. या हत्येचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटत आहेत. सरकारवर विरोधकांनी जोरदार हल्ला चढवला आहे. वर्दळ असलेल्या ठिकाणी ही हत्या झाल्याने ही सर्व जण हैराण आहेत. याबाबत आता पोलिसांनी वेगवेगळी पथकं तयार केली असून तिसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत.  

बाबा सिद्दिकी यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

बाबा सिद्दिकी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मरीन लाईनमधील बडा कब्रस्तान येथे दफनविधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ बडा कब्रस्तानमध्ये उपस्थित

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ बडा कब्रस्तानमध्ये उपस्थित

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात तिसरी अटक, शुबू लोणकरचा भाऊ प्रविण लोणकरला अटक

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात तिसरी अटक, शुबू लोणकरचा भाऊ प्रविण लोणकरला पुण्यातून अटक, शुभम लोणकरसह धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गौतम यांच्या सामील होता.

बाबा सिद्दिकी यांचं पार्थिव बडा कब्रस्तानमध्ये दाखल

बाबा सिद्दिकी यांचं पार्थिव बडा कब्रस्तानमध्ये दाखल

बाबा सिद्दिकींचं पार्थिव घराबाहेर आणलं

बाबा सिद्दिकींचं पार्थिव घराबाहेर आणलं 

बडा कब्रस्तान येथे होणार दफणविधी

झिशान सिद्दिकी यांना अश्रू अनावर

इंदापूर बायपासनजीक बारामती रोडवर ट्रक आणि डंपरचा अपघात, दोन्ही वाहनांनी घेतला पेट

इंदापूर बायपासनजीक बारामती रोडवर ट्रक आणि डंपरचा अपघात झाला आहे. दोन्ही वाहनांनी पेट घेतला आहे. बारामतीकडून एक ट्रक डाळींब घेऊन इंदापूरकडे येत होता. दरम्यान पाठीमागून आलेल्या डंपरने या ट्रकला पाठीमागून धडक दिली. अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळतेय.

बाबा सिद्दिकी यांचं शेवटच दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी

बाबा सिद्दिकी यांचं शेवटच दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे

विश्वजित कदम, निरंजन डावखरे, सुरज चव्हाण बाहेर पडले आहेत.

माजी मंत्री नितीन राऊत सिद्दिकी कुटुंबियांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत

प्रिया दत्त पुन्हा एकदा सिद्दिकी कुटुंबियांच्या भेटीसाठी आल्या आहेत.

बाबा सिद्दकी यांच्यावर बडा कब्रस्तान येथे होणार दफण विधी

बाबा सिद्दकी यांच्यावर बडा कब्रस्तान येथे होणार दफण विधी 

वांद्रे येथील बडा कब्रस्तान येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त

बडा कब्रस्तानची पोलिसांची पाहणी, कब्रस्तान परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण, चौथ्या आरोपीचीही पोलिसांना ओळख पटली

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण

चौथ्या आरोपीचीही पोलिसांना ओळख पटली

मोहम्मद जीशान अख्तर असे चौथ्या आरोपीचे नाव आहे.

जीशान अख्तर हाही फरार आहे

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण, गुरमेल सिंगला न्यायालयाकडून 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपी गुरमेल सिंगला न्यायालयाने 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दुसऱ्या आरोपीला पोलीस कोठडी मिळालेली नाही. वयाची चाचणीनंतर दुसऱ्या आरोपीला पुन्हा हजर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. धर्मराज हा गुन्हे शाखेच्या ताब्यात राहणार आहे. ऑसीफिकेशन चाचणी ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे जी एखाद्या व्यक्तीच्या हाडांच्या संलयनाच्या डिग्रीचे विश्लेषण करून त्याच्या वयाचा अंदाज लावते. वय ठरवण्याची ही पद्धत आहे.

अमरावतीत अवकाळी पावसाची हजेरी

अमरावतीत अवकाळी पावसाची हजेरी

पावसामुळे काढणीला आलेला सोयाबीन पिकाचे नुकसान होण्याची शक्यता

अचानक आलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत

कापसाला देखील फटका बसण्याची शक्यता

आरोपीचा आपण अल्पवयीन असल्याचा दावा

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील एक आरोपी धर्मराज याने आपण अल्पवयीन असल्याचे कोर्टात सांगितले. आपले वय 17 वर्षे आहे. त्यामुळे आपल्याला अल्पवयीन प्रमाणे वागणूक मिळावी अशी त्याने मागणी कोर्टात केली आहे. त्यावर कोर्टाने त्याच्याकडे आधार कार्ड मागितले. 

सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपींना 14 दिवसाच्या पोलिस कोठडीची मागणी

बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना 14 दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी पोलिसांनी केली आहे.  आरोपी काही दिवसांपासून पुणे आणि मुंबईत रहात होते. त्यांच्याजवळ 28 जिवंत काडतुसे सापडली आहेत. त्यांनी एका राजकीय व्यक्तीची हत्या केली आहे. महाराष्ट्रात निवडणूका आहेत. त्यामुळे अन्य नेते त्यांच्या हिटलिस्टवर आहेत का? याचाही तपास करायचा आहे असे पोलिसां मार्फत कोर्टात सांगण्यात आले. 

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपींना किला कोर्टात केले हजर

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी करनैल सिंग आणि धर्मराज कश्यप यांनी किला कोर्टात हजर केले आहे. यातील करनैल सिंग हा हरियाणाचा आहे तर धर्मराज हा उत्तर प्रदेशचा आहे.  

सिद्दीकी कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी ठाकरे जाणार

उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे सिद्दीकी कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी जाणार आहेत. ते आमदार जिशान सिद्दीकी यांची च्यांच्या घरी जावून भेट घेणार आहेत. 

लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली, सोशल मीडियावरुन दिली कबुली.

लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली, सोशल मीडियावरुन दिली कबुली.

सिद्दीकी यांची हत्या करणाऱ्या तिसऱ्या शुटरचे नाव शिवकुमार

बाबा सिद्दीकी यांची तिन जणांनी हत्या केली होती. त्यातील दोघांना मुंबई पोलिसांनी पकडले आहे. तिसरा आरोपी हा फरार आहे. मात्र त्याचे नाव मुंबई पोलिसांना समजले आहे. त्याचे नाव शिवकुमार आहे. तो उत्तर प्रदेशातील रहिवाशी आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहेत. त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी पथकं तयार केली आहेत. 

अजित पवारांनी केले सिद्दीकी कुटुंबाचे सांत्वन

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आमदार झिशान सिद्दीकींची भेट घेतली. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर कुटुंबाचे अजित पवारांनी सांत्वन केले आहे. वांद्रे इथल्या निवासस्थानी जावून अजित पवारांनी हे सांत्वन केले.  

सिद्दिकी यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार

माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. 2004 ते 2008  या काळात ते विविध खात्यांचे राज्यमंत्री होते. तसेच म्हाडाचेही अध्यक्ष होते.

देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी

सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी गृहमंत्री फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. शिवाय शिवसेना नेते संजय राऊत यांनी पण फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. मुख्यमंत्री पोलीसांना गँगसारखे चालवत असल्याचाही आरोप ही राऊत यांनी केला आहे. 

बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला केलेले आरोपी 2 सप्टेंबर पासून होते कुर्ल्यात

बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्या आधी आरोपी हे मुंबईत आले होते. ते कुर्ल्यात दोन सप्टेबरपासून राहात होते. मुंबई राहून त्यांनी सिद्दीकी यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते हे ही आता तपासात पुढे येत आहे. 

बाबा सिद्दीकींना मिळाली नव्हती धमकी

बाबा सिद्दीकी यांना गेल्या काही कालावधीत कोणतीही धमकी मिळाली नव्हती. किंवा तशी कोणती ही तक्रारही त्यांनी केली नव्हती अशी माहिती आता समोर येत आहे. 

राहुल गांधींनी बाबा सिद्दीकींना वाहिली श्रद्धांजली

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर दुख; व्यक्त केले आहे. शिवाय या हत्येची चौकशी झाली पाहीजे अशी मागणी केलीआहे. 

अमरावतीतील उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा रद्द

अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या निधनामुळे अजित पवारांनी आपवा अमरावती दौरा रद्द केला आहे. अमरावतीत आज अजित पवारांची जनसन्मान यात्रा येणार होती. सिद्दीकींच्या निधनामुळे ही यात्रा आता रद्द करण्यात आलीय.

सिद्दीकींच्या हत्येसाठी 15 दिवसापूर्वीच शस्त्र पुरवठा

बाबा सिद्दीकी खून प्रकरणातील तीन आरोपीना 15 दिवसांपूर्वीच शस्त्रे पुरविण्यात आली होती. ही शस्त्रे मानवी कुरिअरद्वारे या तीन आरोपींना देण्यात आली होती.तपासात ही माहिती पुढे आली आहे. 

बाबा सिद्दीकी यांचे शव थोड्याच वेळात त्यांच्या घरी आणणार

बाबा सिद्दीकी यांचे शव त्यांच्या घरी पुढील 1 तासात आणले जाणार आहे. त्यानंतर पार्थिव  दिवसभर घरी अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. संध्याकाळी सात वाजता नमाज पठण करून मरीन लाईन्स येथे बडा कबरस्तान येथे शव दफन केले जाईल. 

सिद्दीकी हत्येनंतर केंद्रीय तपास यंत्रणा मुंबई पोलिसांच्या संपर्कात

अटक करण्यात आलेल्या शूटर्सचा विश्नोई टोळीशी संबंध असल्याचा दावा करण्यात आला आहे. या दाव्याची पडताळणी केली जात असून, मुंबई पोलिसांव्यतिरिक्त केंद्रीय तपास यंत्रणा मुंबई पोलिसांच्या संपर्कात आहेत. त्याच बरोबर गुजरात पोलिसांशिवाय दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेलही या प्रकरणाचा तपास करत आहे.

मारेकऱ्यांची होत आहे कसून चौकशी

बाबा सिद्दीकींची हत्या करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची मुंबई क्राइम ब्रँच युनिट 3 मध्ये चौकशी केली जात आहे. तिथे मुंबई स्पेशल सीपी देवेन भारती, जॉइंट सीपी क्राईम-लखमी गौतम, दया नायक हे देखील उपस्थित आहेत.

बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्याला शोधण्यासाठी चार पथकं तयार

बाबा सिद्दीकी यांची तीन जणांनी हत्या केली. त्यातील दोघांना पकडण्यात आले आहे. तर तिसरा आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी चार टीम तयार करण्यात आल्या आहेत. त्या देशातील वेगवेळ्या राज्यात पाठवण्यात आल्या आहेत. 

Previous Article
बाबा सिद्दिकी शानदार इफ्तार पार्टींसाठी होते प्रसिद्ध, सलमान-शाहरुखमधील मिटवले होते मोठे भांडण 
Highlights : बाबा सिद्दिकी यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Amravati Congress-MLA-Sulbha-Khodke-Suspended-for-Six-Years-from-Congress
Next Article
काँग्रेसच्या 'त्या' आमदारावर अखेर निलंबनाची कारवाई, पक्षा विरोधात भूमिका भोवली