जाहिरात
Story ProgressBack

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका 5 टप्प्यात; तुमच्या जिल्ह्यात मतदान कधी?

महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, आणि 20 मे या पाच दिवसात राज्यातील विविध भागात निवडणूका पार पडणार आहेत. याशिवाय 4 जूनला मतमोजणी होणार आहे. 

Read Time: 2 min
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका 5 टप्प्यात; तुमच्या जिल्ह्यात मतदान कधी?
मुंबई:

देशात 18 व्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकाचा बिगुल वाजला असून सर्व पक्षांची तयारी शिगेला पोहोचली आहे. निवडणूक आयोगाने 16 मार्च रोजी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. यानुसार सार्वत्रिक निवडणूका सात टप्प्यात होणार आहेत. यातही महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूका होणार असल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं. महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, आणि 20 मे या पाच दिवसात राज्यातील विविध भागात निवडणूका पार पडणार आहेत. याशिवाय 4 जूनला मतमोजणी होणार आहे. 

यंदा तब्बल 97 कोटी मतदार केंद्र सरकार ठरवतील. पत्रकार परिषदेला संबोधित करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ हा 16 जून 2024 रोजी संपणार आहे. याशिवाय आंध्रप्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभांचा कार्यकाळदेखील संपुष्टात येणार आहे. या लोकसभा निवडणुकीसाठी 10.5 लाख मतदान केंद्रे, 1.5 कोटी मतदान अधिकारी, सुरक्षा अधिकारी आणि 55 लाखांहून अधिक ईव्हीएम, 4 लाख वाहने आदी तयारी करण्यात आली आहे.  

महाराष्ट्रात कधी होणार मतदान 


1. 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमुर, चंद्रपूर (एकूण मतदारसंघ - 5)

2. 26 एप्रिल - बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी (एकूण मतदारसंघ - 8)

3. 7 मे - रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले (एकूण मतदारसंघ - 11 )
   
4. 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड (एकूण मतदारसंघ - 11 ) 

5. 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण (एकूण मतदारसंघ - 13)

देशभरातील मतदारांमध्ये लिंग गुणोत्तर 948 आहे आणि 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिलांचे प्रमाण जास्त असल्याचे त्यांनी सांगितले. 85 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मतदारांसाठी आणि देशभरातील दिव्यांग व्यक्तींसाठी घरबसल्या मतदानाची सुविधा देण्यासाठी निवडणूक आयोगाने तयारी केली आहे. 

रामटेक19 एप्रिल
नागपूर19 एप्रिल
भंडारा-गोंदिया19 एप्रिल
गडचिरोली-चिमुर19 एप्रिल
चंद्रपूर19 एप्रिल
बुलढाणा26 एप्रिल
अकोला26 एप्रिल
अमरावती26 एप्रिल
वर्धा26 एप्रिल
यवतमाळ-वाशिम26 एप्रिल
हिंगोली26 एप्रिल
नांदेड26 एप्रिल
परभणी26 एप्रिल
रायगड7 मे
बारामती7 मे
उस्मानाबाद7 मे
लातूर7 मे
सोलापूर7 मे
माढा7 मे
सांगली7 मे
सातारा7 मे
रत्नागिरी-सिंधुदुर्ग7 मे
कोल्हापूर7 मे
हातकणंगले7 मे
नंदूरबार13 मे
जळगाव13 मे
रावेर13 मे
जालना13 मे
औरंगाबाद13 मे
मावळ13 मे
पुणे13 मे
शिरूर13 मे
अहमदनगर13 मे
शिर्डी13 मे
बीड13 मे
धुळे20 मे
दिंडोरी20 मे
नाशिक20 मे
पालघर20 मे
भिवंडी20 मे
कल्याण20 मे
ठाणे20 मे
मुंबई उत्तर20 मे
मुंबई उत्तर पश्चिम20 मे
मुंबई उत्तर पूर्व20 मे
मुंबई उत्तर मध्य20 मे
मुंबई दक्षिण मध्य20 मे
मुंबई दक्षिण20 मे
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination