2 months ago
मुंबई:

गेले दोन दिवस मुंबईत मुसळधार पाऊस झाला. मात्र मुंबईकरांवर पाणी टंचाईचं संकट अजूनही कायम आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये सुमारे 20% पाणीसाठा आहे. धरणांमध्ये किमान 80% पाणीसाठा झाल्यास पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे मुंबईकरांवर अजूनही पाणी टंचाईची तंगती तलवार कायम राहणार आहे. अद्यापही धरण परिसरात चांगला पाऊस झालेला नाही. तो होईपर्यंत नागरिकांना पाण्याची वा पाहावी लागणार आहे. 

Jul 10, 2024 15:30 (IST)

शेतकऱ्यांकडून जास्त भावात टोमॅटो आणि कांदे विकत घेऊन सरकार बाजारात अर्ध्या किमतीत विकणार

Jul 10, 2024 15:28 (IST)

कोकण रेल्वे विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल

पेडणे येथे कोकण रेल्वेच्या बोगद्यात आलेल्या पाण्यामुळे कोकण रेल्वे विस्कळीत झाली असून 10 ते 12 तास रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. जिल्ह्यातील कुडाळ स्थानकावर मुंबईला जाणारे प्रवासी ताटकळत उभे राहिले होते. शेवटी प्रवाशांनी आपली तिकीट रद्द करून घरी जाणे पसंत केले. 

Jul 10, 2024 13:36 (IST)

वरळी हिट अँड रन प्रकरणात राजेश शहा यांची शिवसेना उपनेते पदावरून हकालपट्टी

वरळी हिट अँड रन प्रकरणात राजेश शहा यांची शिवसेना उपनेते पदावरून हकालपट्टी

राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा याचे हिट अँड रन प्रकरण नडले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने केलं पदमुक्त

Jul 10, 2024 12:54 (IST)

रेकॉर्डब्रेक ! 95 हजार कोटीच्या पुरवण्या मागण्या सादर

सरकारकडून 95 हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या सादर, लाडकी बहीण योजनेसाठी 25 हजार कोटी 

Advertisement
Jul 10, 2024 12:10 (IST)

आरक्षणाच्या चर्चेवरून सभागृहात गदारोळ

आरक्षणाच्या चर्चेवरून सभागृहात गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. सर्वपक्षीत बैठकीत विरोधक का आले नाहीत, असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला. त्यांना मराठा आरक्षणाचं काही पडलेलं नाही. तर सभागृहाबाहेर यांचा बोलविता धनी वेगळाच असल्याचा आरोप शेलारांनी विरोधकांवर केला. 

Jul 10, 2024 11:51 (IST)

मराठा आरक्षणासंदर्भातली सर्वात मोठी बातमी, 11 अधिकारी आपलं काम संपून आजच परतणार

मराठा आरक्षणासंदर्भातली सर्वात मोठी बातमी एनडीटीव्हीवर

महाराष्ट्र सरकारचे 11 अधिकारी आपलं काम संपून आजच परत येणार आहेत. गेल्या तीन दिवसांपासून हे  पथक हैदराबादमध्ये आहेत. छत्रपती संभाजी नगरचे चार, मंत्रालयातील चार, नांदेडचे तीन अधिकारी गेल्या तीन दिवसापासून हैदराबादमध्ये आहेत. या पथकांमध्ये भाषा तज्ज्ञ आहेत. या अधिकाऱ्यांनी 6000 हून अधिकची कागदपत्रं आपल्या ताब्यात घेतली आहेत. 1800, 1820 1900 या दरम्यानच्या हैदराबाद राजवटीत झालेल्या जनगणनेचे दस्तऐवड महाराष्ट्र सरकारकडे आहेत.  

Advertisement
Jul 10, 2024 11:25 (IST)

रावेत येथील कॅफे लव्ह बर्ड कॅफे शॉपवर कारवाई

पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाकडून रावेत येथील कॅफे लव्ह बर्ड कॅफे शॉपवर कारवाई

या कॅफेमध्ये प्रेमयुगल तरुण-तरुणींना गैर कृत्य करण्यासाठी छोटे छोटे सोफे लावून प्लायवूडचे कंपाउंड टाकून लॉज स्वरूपातील काही खोल्या तयार केल्या होत्या, यासंदर्भात पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला खबर लागली. त्यांनी या कॅफेवर कारवाई केली. याप्रकरणी कॅफे चालक धीरज प्रकाश मोहिते व त्याच्या सोबत काम करणारी महिला यांच्यावरती रावेत पोलिसांत कलम 129 व 131 नुसार गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे रावेत पोलीस स्टेशनच्या समोरच असलेल्या कॅफेमध्ये हा प्रकार सुरू असताना या संदर्भात पोलिसांना यांना काहीच लागली नव्हती का ? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

Jul 10, 2024 10:12 (IST)

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणखी एक आघाडी उभी होण्याची चर्चा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणखी एक आघाडी उभी होण्याची चर्चा सुरू झाली आहे. अमरावतीच्या प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी ही नवी आघाडी उभी करण्याचे जाहीर केले आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांची एकजूट करून राजकीय वोट बँक तयार करावी या उद्देशाने ही आघाडी उभी करण्यात येणार असल्याचे रविकांत तुपकर यांनी जाहीर केले आहे. 

Advertisement
Jul 10, 2024 10:06 (IST)

विश्रांतीनंतर शहापूरात पावसाची दमदार सुरूवात

विश्रांतीनंतर शहापूरात पावसाची दमदार सुरूवात

दोन दिवसांपूर्वी शहापूरात मुसळधार पावसामुळे  पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. कालचा पूर्ण दिवस पावसाने उघड दिली होती.  मात्र आज पावसाने सकाळपासूनच जोरदार सुरूवात केल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमानी, नागरिकांची आणी शाळेय विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. 

Jul 10, 2024 10:04 (IST)

मुंबईतील सातही तलावक्षेत्रात मिळून 21.67 टक्के पाणीसाठा

मुंबईतील सातही तलावक्षेत्रात मिळून 21.67 टक्के पाणीसाठा

मागील वर्षी याचवेळी हा पाणीसाठा 24.93 टक्के होता